नांदेड-पुणे एक्स्प्रेसची पनवेलपर्यंत धाव ...
more... औरंगाबाद - नांदेड-पुणे त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस 1 फेब्रुवारी 2017 पासून पनवेलपर्यंत धावणार आहे. ही रेल्वे पनवेलपर्यंत सोडण्याची मागणी प्रवाशांतर्फे सतत करण्यात येत होती. त्यामुळे दक्षिण-मध्य रेल्वेतर्फे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नांदेड विभागाने दिली.
नांदेड ते पुणे मार्गावरील त्रिसाप्ताहिक एक्स्प्रेस (गक्र. 17613) नियमित करण्यात आली होती. आता ती आठवड्यातून शनिवार वगळता सहा दिवस धावणार आहे. ही गाडी नांदेडहून सायंकाळी साडेपाच वाजता सुटेल; तसेच परतीसाठी ही गाडी पनवेल येथून रविवारी धावणार नाही. पनवेल येथून ही रेल्वे सायंकाळी चार वाजता सुटेल. पुणेमार्गे नांदेड येथे सकाळी 9.25 वाजता पोचेल. नांदेड-पुणे नांदेडमार्गे औरंगाबाद, मनमाडच्या वेळेत; तसेच दिवसात कोणताही बदल केलेला नाही. ही रेल्वे नांदेडहून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवारी सुटेल. तर पनवेलहून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी सुटेल.