Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

হাওড়া - বর্দ্ধমান কর্ড লাইনে যান, 130 কিমি বেগে ট্রেন যাওয়াও কালবৈশাখী ঝড়ের থেকে ভয়ঙ্কর! - Jishnu Thakur

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 4762238
Posted: Oct 30 2020 (00:43)

1 Responses
Last Response: Oct 30 2020 (01:04)
General Travel
7085 views
1

Oct 30 2020 (00:43)   SUR/Solapur (5 PFs)
भावड्या
भावड्या   105 blog posts
Entry# 4762238            Tags  
Good News; ताशी २२० कि.मी. वेगाने धावणारी हायस्पीड ट्रेन सोलापूरमार्गे click here

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील प्रवाशांना एक दिलासा देणारी बातमी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (एनएचएसआरसी)ने मंगळवारी जाहीर केली़ सोलापूर विभागातून मुंबई-पुणे-हैदराबादमार्गे धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या पहिल्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे़ मात्र हायस्पीड ट्रेन सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबविण्याबाबत राज्य सरकारशी चर्चा झाल्यानंतरच निश्चित सांगता येईल, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान,
...
more...
११११ किमी लांबीच्या मुंबई-पुणे-हैदराबाद या मार्गावर हायस्पीड ट्रेन चालविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे़ याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, निविदानुसार डीपीआरसाठी नेमलेल्या कंत्राटदाराला ओव्हरहेड, भूमिगत आणि भूमिगत उपयुक्तता ओळखण्यासाठी, त्याचबरोबर वेगवान रेल्वेसाठी लागणारा विजेचा पुरवठा, उपकेंद्रांसाठी वीज उपलब्धतेचे पर्याय या टेेंडरमधून समोर येणार आहे़ टेंडरनुसार मार्ग सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारशी समन्वय साधला जाणार असल्याचेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

राज्य सरकारच्या चर्चेनंतर स्थानकांची होणार निश्चिती...

मुंबई-पुणे-हैदराबाद या हायस्पीड ट्रेनबाबतची निविदा १ नोव्हेंबर रोजी उघडण्यात येणार आहे. शिवाय ५ नोव्हेंबर रोजी त्यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले़ मार्ग सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाशी समन्वय साधून विचारविनिमय करून कोणत्या स्थानकावर हायस्पीड ट्रेन थांबवावी, याबाबत निर्णय होणार आहे़ सध्या मुंबई ते हैदराबाददरम्यान सर्वात वेगवान रेल्वेगाडी हुसेनसागर एक्स्प्रेस आहे जी १७ तास १० मिनिटात हैदराबादमध्ये पोहोचते़

सोलापूर रेल्वे स्थानक हे कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे़ मुंबई ते हैदराबाद या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक म्हणून सोलापूर स्थानकाचा नामोल्लेख होतो़ हायस्पीड ट्रेनला सोलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा, यासाठी राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशनसोबत पत्रव्यवहार करणार आहे़ हायस्पीड ट्रेनचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांना व्हावा, यासाठी जे जे करावे लागेल ते ते करायला तयार आहे़

Translate to English
Translate to Hindi

5387 views
1

Oct 30 2020 (01:04)
Goawaychinaviru
Goawaychinaviru   949 blog posts
Re# 4762238-1              
११११ किमी लांबीच्या मुंबई-पुणे-हैदराबाद ???

Mumbai-Pune-Solapur-Wadi-Hyderabad is 800 kms. IDK if Devgiri express route is that long. Reporter certainly miscalculated!

Solapur-Hyderabad is about 300 km by road. Pune-Solapur is 260 km, and Mumbai-Pune
...
more...
by expressway is 160 km. That adds up to 720 km by road. What detour this HSR will take?? If Mumbai terminal is BKC along with Ahmedabad HSR, distance will be lesser.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy