Full Site Search  
Fri Jul 21, 2017 08:11:05 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;
Large Station Board;
Large Station Board;
Large Station Board;

ANG/Ahmadnagar (2 PFs)
     अहमदनगर
[Nagar]

Track: Single Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 66
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Station Road, Ahmednagar 414001
State: Maharashtra
Elevation: 651 m above sea level
Zone: CR/Central
Division: Solapur
No Recent News for ANG/Ahmadnagar
Nearby Stations in the News

Rating: 3.2/5 (50 votes)
cleanliness - good (7)
porters/escalators - average (5)
food - average (7)
transportation - average (6)
lodging - average (6)
railfanning - good (6)
sightseeing - good (6)
safety - good (7)

Nearby Stations

NNB/Nimblak 6 km     AKR/Akolner 13 km     VL/Vilad 16 km     SRL/Sarola 18 km     VBR/Vambori 27 km     RNJD/Ranjangaon Road 28 km     VPR/Visapur 35 km     RRI/Rahuri 40 km    

Station News

Page#    Showing 1 to 17 of 17 News Items  
Apr 19 2017 (18:27)  नव्या रेल्वे प्रकल्पांची उभारणी आॅगस्टपासून (www.lokmat.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 300104     
   Tags   Past Edits
Apr 19 2017 (18:27)
Station Tag: Wardha Junction/WR added by Amey Ambre~/16020

Apr 19 2017 (18:27)
Station Tag: Parli Vaijnath/PRLI added by Amey Ambre~/16020

Apr 19 2017 (18:27)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by Amey Ambre~/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
मुंबई : राज्यात हाती घेण्यात आलेल्या अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-नांदेड, वडसा-गडचिरोली इत्यादी नवीन रेल्वे मार्ग निर्मितीसाठीचे आवश्यक भूसंपादन येत्या जुलैअखेर पर्यंत पूर्ण करुन ही जमीन रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आज दिले. तर भूसंपादन होताच आॅगस्टपासून काम सुरू करण्याचे निर्देश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी दिले.
फडणवीस व प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यातील रेल्वे प्रकल्पांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. यावेळी बेलापूर-सीवुड्स-उरण नवीन मार्गाची निर्मिती, ठाकुर्ली, कुर्ला, शाहाड येथील उड्डाणपुलांचे बांधकाम, पारसिक बोगदा येथील अतिक्रमणे, राज्यातील विविध रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, पुणे-लोणावळा दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मागार्ची निर्मिती, जळगाव उड्डाणपुलाचा प्रश्न, आर्वी-वरुड दरम्यान नवीन मागार्चे सर्वेक्षण, डीडीसीसीआयएलएल प्रकल्प अशा विविध प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात रेल्वेचे १ लाख ३६ हजार
...
more...
कोटी रुपये खर्चाचे प्रकल्प हाती घेण्यात आल्याची माहिती प्रभू यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
हार्बर मार्गावर बारा डबा लोकल सुरु झाल्यानंतर या मार्गावरील दोन लोकलमधील वेळा कमी होतानाच प्रवाशांना झटपट लोकल मिळावी यासाठी सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस ट्रेन कंट्रोल यंत्रणा) या मार्गावर राबवावी, अशी राज्य सरकारची आग्रही भूमिका आहे.
जवळपास ४,३00 कोटी रुपयांचा असलेला प्रकल्प मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडून नीती आयोग आणि नंतर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाईल, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी सांगितले.
सध्या मध्य रेल्वेची मेन लाईन, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आॅटो सिग्नल यंत्रणेबरोबरच ट्रॅक सर्किंट यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, ही यंत्रणा हाताळताना रेल्वेला बरीच कसरत करावी लागते. त्यामुळे नवी सिग्नल यंत्रणा बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सध्या परदेशात रेल्वे मार्गांवर सिग्नलमधील सीबीटीसीसारखे उच्च तंत्रज्ञान वापरण्यात येत असून त्यामुळे एकामागोमाग ट्रेनच्या फेऱ्या होणे, ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणे आदीसाठी मदत मिळत आहे. याचा फायदा होत असल्याने ही यंत्रणा हार्बरवर बसवण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.
Apr 05 2017 (11:35)  रेल्वे प्रवाशांवर अ‍ॅसिड हल्ला (www.lokmat.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 298606     
   Tags   Past Edits
Apr 05 2017 (11:35)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by ameyambre~/16020

Apr 05 2017 (11:35)
Station Tag: Daund Junction/DD added by ameyambre~/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
अहमदगर : दौंड ते नगर रेल्वे प्रवासादरम्यान पुणे-पाटणा एक्सप्रेसमधील सर्वसाधारण डब्यातील तिघा प्रवाशांना दोघा चोरट्यांनी मारहाण करत त्यांच्याकडील पैसे लुटले़ प्रवाशांनी प्रतिकार केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडसारखा पदार्थ फेकून त्यांना जखमी केले़
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली़ पुणे-पाटणा एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या विश्वनाथ राजधारी यादव (बिहार), प्रकाश गुंतीलाल गुनकर व बंडुकुमार कौल (मध्य प्रदेश) यांच्यावर शनिवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी अचानक हल्ला केला़ त्यांच्याजवळील १,६०० रुपये काढून घेतले़ प्रवाशांनी चोरट्यांचा विरोध केला असता त्यांच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिडसारखा पदार्थ फेकून त्यांना जखमी करण्यात आले़
रेल्वेने दौंड स्टेशन सोडल्यानंतर पुढील दहा मिनिटांत धावत्या रेल्वेत ही
...
more...
घटना घडली़ घटनेनंतर रेल्वेच्या मनमाड पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ जखमींवर प्रथम मनमाड येथे तर नंतर नाशिक येथे उपचार करण्यात आले़
Mar 15 2017 (11:44)  रेल्वे प्रवासाची आवड भोवली! (www.pudhari.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 296373     
   Tags   Past Edits
Mar 15 2017 (11:44)
Station Tag: Manmad Junction/MMR added by ameyambre/16020

Mar 15 2017 (11:44)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
रेल्वे प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी 16 वर्षांचा मुलगा कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडला. नगर-मनमाड-नगर असा प्रवास करण्याचे त्याचे ठरले. परंतु कोणत्या दिशेने जाणार्‍या रेल्वेत बसायचे, हेच समजले नाही अन् तो फसला. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर अखेर तो मुंबईत सापडला.

याबाबत माहिती अशी की, मुकुंदनगरमध्ये राहणारा 16 वर्षीय मुलगा रेल्वेत कधीच बसला नव्हता. त्याने रेल्वे प्रवासाचा आनंद घेण्याचे ठरविले. त्याच्या खिशात थोडेसे पैसे होते. तीन दिवसांपूर्वी तो घरातून बाहेर पडला. नगर रेल्वे स्टेशनवर गेला. त्याने नगरहून मनमाडला जाऊन पुन्हा नगरला येण्याचे ठरविले. नगर-मनमाड-नगर अशी तिकिटही काढले. त्यानंतर रेल्वे फलाटावर गेला. दौंडच्या दिशेने
...
more...
जाणारी रेल्वे फलाटावर थांबली. मनमाड नेमके कोणत्या दिशेने आहे, हेच समजले नसल्याने तो दौंडकडे चाललेल्या गाडीत बसला. खूप अंतर गेल्यावर त्याला आपण फसलो आहोत, हे लक्षात आले. तो नगरला परतण्यासाठी मिळेल त्या गाडीने बसू लागला. परंतु, प्रत्येकवेळी फसत गेला अन् थेट मुंबईला पोहोचला.

दुसरीकडे घरी मुलाचा पत्ता लागत नसल्याने त्याचे कुटुंबिय काळजीत पडले. त्यांनी मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो सापडला नाही. अखेर त्याचे कुटुंबिय पोलिस ठाण्यात गेले. कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कवडे, कर्मचारी गांगुर्डे यांनी त्या मुलाचा शोध सुरू केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना बेपत्ता मुलगा मुंबईत असल्याचे समजले. उपनिरीक्षक कवडे यांच्या पथक मुंबईत गेले व त्यांनी सदर मुलाला ताब्यात घेतले. काल (दि. 12) नगरला आणल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
Mar 08 2017 (22:09)  २०१९ पर्यंत धावणार नगर-बीड रेल्वे (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
CR/Central  -  

News Entry# 295763   Blog Entry# 2231335     
   Tags   Past Edits
Mar 08 2017 (22:09)
Station Tag: Beed/BEED added by Daund Lonavla Local Soon^~/1269766

Mar 08 2017 (22:09)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by Daund Lonavla Local Soon^~/1269766

Posted by: 55 Percent trains in India are Locals^~  75 news posts
नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून २०१९ पर्यंत नगर-बीड रेल्वे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढील एक वर्षात परळीपर्यंतचे सर्व काम पूर्ण करण्यात येईल,’ अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली. येथील रेल्वे स्टेशनची पाहणी करण्यासाठी शर्मा हे शनिवारी नगरमध्ये आले होते.
नगर-बीड-परळी हा मार्ग दीर्घकाळापासून रखडला आहे. परंतु यंदाच्या अर्थसंकल्पात या मार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाने गती घेतली असून २०१९ पर्यंत नगर-बीड रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. याबाबत बोलताना शर्मा यांनी सांगितले की, ‘नगर-परळी मार्ग बनवण्यासाठी निधीची कमतरता असल्यामुळे हे काम रखडले होते. परंतु आता महाराष्ट्रामध्ये २२ हजार कोटी रूपये खर्च करून नऊ मोठे प्रोजेक्ट रेल्वे विभाग व राज्य सरकार यांच्या वतीने पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये नगर-परळी मार्गाचा समावेश करण्यात
...
more...
आला असून हा मार्ग बनवण्यासाठी प्राथमिकता दिली जात आहे. या मार्गातील पहिला टप्पा ‘नगर ते नारायण डोह’ असून तो पूर्ण झाला आहे. पुढील दोन ते तीन आठवड्यांमध्ये हा मार्ग सुरू करण्याचे आमचे प्रयत्न असणारे आहे. त्यानंतर सर्वांत प्रथम बीडपर्यंत रेल्वे मार्ग पूर्ण करून २०१९ पर्यत तो पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर पुढील एका वर्षात परळीपर्यंत मार्ग पूर्ण करण्यात येईल,’ असेही शर्मा यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाप्रबंधक डी.के.शर्मा यांनी नगर रेल्वेस्टेशनच्या परिसरात भेट देऊन स्थानिक अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. तसेच स्टेशनच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या वाचनालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

769 views
Apr 11 2017 (19:00)
AurngabadPurnaAkolaNagpur~   736 blog posts   1 correct pred (20% accurate)
Re# 2231335-1            Tags   Past Edits
pahale march 2018 bole the
Mar 08 2017 (22:03)  नगरचे स्टेशन होणार स्मार्ट (maharashtratimes.indiatimes.com)
back to top
CR/Central  -  

News Entry# 295760     
   Tags   Past Edits
Mar 08 2017 (22:03)
Station Tag: Ahmadnagar/ANG added by Daund Lonavla Local Soon^~/1269766

Posted by: 55 Percent trains in India are Locals^~  75 news posts
अहमदनगर रेल्वे स्टेशनवर लवकरच सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. याठिकाणी मोफत वायफाय सोबतच प्रवाशांसाठी इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी दिली. त्यामुळे सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू असलेले नगरचे रेल्वे स्टेशन हे अधिकच ‘स्मार्ट’ होणार असल्याचे चित्र आहे.
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक शर्मा यांनी नगर जिल्ह्यातील विविध रेल्वे स्टेशनला शनिवारी भेट दिली. नगरच्या स्टेशनवर शर्मा यांचा दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ताफा आला. त्यानंतर शर्मा यांनी सर्वात प्रथम स्टेशनच्या प्रवेशद्वारावर येत सुशोभिकरणाच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. प्रवेशद्वाराजवळ कारंजे कधी सुरू केले, येथे किती हायमॅक्स बसवले आहेत, याबाबत विचारणा स्थानिक अधिकाऱ्यांना शर्मा यांनी केली. त्यानंतर व्हीआयपी कक्षात खासदार दिलीप गांधी, आमदार संग्राम जगताप, रेल्वे सल्लागार समितीचे हरजितसिंग वधवा यांच्यासह विविध संघटनांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी
...
more...
नगरच्या स्थानकावर मोफत वायफाय द्या, सीसीटीव्ही बसवा, अशा विविध मागण्या करण्यात आले. त्यावर बोलताना शर्मा यांनी सांगितले की, ‘देशभरातील विविध रेल्वेस्टेशनवर सीसीटीव्ही बसवण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्यामध्ये नगरच्या स्टेशनचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे २०१७-१८ मध्ये या स्थानकावर सर्वत्र सीसीटीव्ही बसवलेले दिसतील. याशिवाय लवकरच या स्थानकावर मोफत वायफाय सुविधा सुद्धा देण्यात येईल. नगरच्या रेल्वेस्टेशनचा समावेश हा मॉडर्न स्टेशनमध्ये करण्यात आल्यामुळे येथे ठिकठिकाणी एलईडी लाइट बसवणे, प्रवाशांना बसण्यासाठी व्यवस्था करणे, लिफ्ट, अशा प्रवाशांना आवश्यक सर्व सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.’
नगर-पुणे प्रवास होणार वेगवान
नगर-पुणे रेल्वे प्रवासा दरम्यान दौंड येथे इंजीन बदलण्यासाठी गाडीला जवळपास चाळीस मिनिटे लागतात. त्यामुळे हा प्रवास वेगवान व्हावा, यासाठी रेल्वे कॉडलाइन टाकण्यात यावी, अशी मागणी सातत्याने रेल्वे विभागाकडे करण्यात येत आहे. शनिवारी देखील महाप्रबंधक शर्मा यांनी नगरला भेट दिल्यानंतर त्यांना रेल्वे कॉडलाइन बाबत विचारणा करण्यात आली. याबाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘कॉडलाइन टाकण्यासाठी आवश्यक असणारी दीड किलोमीटरची जमीन अधिग्रहण करावी लागणार आहे. त्यासाठी पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव तयार करून दिला आहे. जमीन अधिग्रहण करण्याच्या काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने ही लाइन टाकण्यात येईल. यावेळी खासदार दिलीप गांधी यांनीही जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलून हे काम मार्गी लागण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले. तर, नगर-दौंड-पुणे अशी डेमू रेल्वे (Demu Train) सुरू करण्याची मागणी हरजितसिंग वधवा यांनी केले. त्यालाही शर्मा यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
Page#    Showing 1 to 17 of 17 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.