Full Site Search  
Sun Jul 23, 2017 14:25:40 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;

UDGR/Udgir (1 PFs)
उदगीर/ادگير     उदगिर

Track: Single Diesel-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 22
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Dist. Latur 413517 Ph. No 02385 256022
State: Maharashtra
Elevation: 646 m above sea level
Zone: SCR/South Central
Division: Secunderabad
No Recent News for UDGR/Udgir
Nearby Stations in the News

Rating: 4.8/5 (14 votes)
cleanliness - excellent (2)
porters/escalators - good (1)
food - good (1)
transportation - excellent (2)
lodging - excellent (2)
railfanning - excellent (2)
sightseeing - excellent (2)
safety - excellent (2)

Nearby Stations

KTKR/Kumtha Khurd 12 km     HER/Her 17 km     KMNR/Kamalnagar 19 km     AMBR/Ambika Rohina 20 km     NGHW/Nageshwadi Halt 24 km     CKX/Chakur 28 km     KCP/Kalgupur 29 km     LTRR/Latur Road Junction 33 km     WDLN/Wadwal Nagnath 38 km    

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
May 05 2017 (08:50)  रेल्वेप्रश्नी खासदार सुनील गायकवाडांची पंचाईत (www.loksatta.com)
back to top
PoliticsCR/Central  -  

News Entry# 301643     
   Tags   Past Edits
May 05 2017 (08:50)
Station Tag: Bidar/BIDR added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Station Tag: Udgir/UDGR added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Station Tag: Latur/LUR added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Train Tag: Bidar - Yesvantpur Express/16572 added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Train Tag: Yesvantpur - Bidar Express/16571 added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Train Tag: Hyderabad - Pune Express/17014 added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Train Tag: Pune - Hyderabad Express/17013 added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Train Tag: Latur - Mumbai CST SF Express/22108 added by z^~/1269766

May 05 2017 (08:50)
Train Tag: Mumbai CST - Bidar SF Express/22107 added by z^~/1269766

Posted by: 55 Percent trains in India are Locals^~  75 news posts
लातूर एक्स्प्रेसवरून दोन्ही बाजूंच्या नाराजीचा सामना; उदगीरनंतर आज लातूर बंदची हाक
लातूर एक्स्प्रेस आठवडय़ातून तीन दिवस बिदपर्यंत विस्तारीकरण करण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधात लातूरकरांनी शुक्रवारी शहर बंदचा निर्णय घेतला असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांबरोबर मराठवाडा जनता विकास परिषद, रेल्वे संघर्ष समिती अशा सर्वानीच एकजूट दाखवली आहे. या रेल्वे प्रश्नात लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांची पंचाईत झाली आहे. गाडीला विरोध केला तर उदगीरकर, विरोध नाही केला तर लातूरकर नाराज होणार असल्याने नेमकी काय भूमिका घ्यावी, असा प्रश्न खासदार गायकवाड यांच्यासमोर उभा राहिला, मात्र त्यातूनही त्यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ प्रमाणे मार्ग काढला आहे.
लातूरहून
...
more...
मुंबईला जाणारी एकमेव रेल्वे विलासराव देशमुख यांच्या प्रयत्नाने सुरू झाली. बऱ्याच वर्षांनंतर लातूरहून थेट मुंबईला जाण्याची सोय झाल्यामुळे ही रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरली. दीडशे टक्के क्षमतेने ही रेल्वे सुरू असताना लातूरकरांची गरसोय होत आहे. रेल्वेने या गाडीला अतिरिक्त डबे जोडावेत, अशी मागणी प्रवाशांची होत असतानाही ती मागणी मान्य न करता आठवडय़ातून तीन दिवस ही रेल्वे बिदपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बिदरचे खासदार भगवंत खुब्बा यांनी आपले वजन खर्ची घालून ही मागणी पदरात पाडून घेतली. लातूरचे खासदार सुनील गायकवाड हे कात्रीत सापडले आहेत. गाडीला विरोध केला तर उदगीरकर नाराज व विरोध नाही केला तर लातूरकर नाराज. हे दोघेही त्यांच्या मतदारसंघातीलच. त्यामुळे अतिरिक्त रेल्वे सुरू करण्याचा आपला प्रयत्न असल्याची भूमिका मांडत त्यांनी ‘नरो वा कुंजरो वा’ची भूमिका घेतली आहे.
लातूर एक्स्प्रेस ही लातूरकरांची अस्मिता बनल्यामुळे सर्वच जण या रेल्वेच्या विस्तारीकरणास विरोध करत आहेत. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, मात्र लातूरकरांनी तो हाणून पाडला होता. आता लातूरकरांच्या सोबतीला पहिल्यांदाच उस्मानाबादकर धावून आल्यामुळे लातूर एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणाचा विरोध दुपटीने वाढला आहे. रेल्वे प्रशासन जनतेच्या भावनांची दखल घेणार की नाही, असा प्रश्न नव्याने निर्माण झाला आहे.
उदगिरात कडकडीत बंद
मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वेचे बिदपर्यंत आठवडाभर विस्तारीकरण करावे, हैदराबाद-पुणे रेल्वेसेवा आठवडय़ातील सर्व दिवस सुरू करावी, यशवंतपूर (बंगळूरु) ते बिदर ही गाडी लातूपर्यंत विस्तारित करावी, आदी मागण्यांसाठी उदगीरवासीयांनी दिलेल्या बंदच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे या सर्व राजकीय पक्षांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्थांनीही बंदला पाठिंबा दिला. लातूरची रेल्वे उदगीर माग्रे गेल्यामुळे जळकोट, उदगीर, देवणी, अहमदपूर, चाकूर, आदी तालुक्यांतील लोकांना मुंबईपर्यंत जाण्याची चांगली सोय होणार आहे. त्यामुळे सर्वच मंडळी या बंदमध्ये सहभागी होती. लातूरकरांनी लातूर एक्स्प्रेस विस्तारीकरणास विरोध केल्यानंतर उदगीरची मंडळी संतप्त झाली आहेत. लातूरकरांच्या भूमिकेच्या विरोधात आवाज उठवत उदगीरकरांनी एकजूट दर्शवली आहे.
Apr 27 2016 (11:03)  लातूरप्रमाणेच उदगीरलाही रेल्वेने पाणी देण्याची तयारी (online4.esakal.com)
back to top
IR AffairsSCR/South Central  -  

News Entry# 265929     
   Tags   Past Edits
Apr 27 2016 (11:03AM)
Station Tag: Udgir/UDGR added by ameyambre/16020

Apr 27 2016 (11:03AM)
Station Tag: Latur/LUR added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
उदगीर - लातूरप्रमाणेच उदगीरलाही रेल्वेने पाणी देण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी मंगळवारी मान्य केले असून, यासाठी रेल्वे मंत्रालय व वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली उदगीर, जळकोट तालुक्‍याची मंगळवारी टंचाई आढावा बैठक झाली. उदगीरला गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई असून, रेल्वेने पाणी देण्याची मागणी पुढे आली आहे. या अनुषंगाने बोलताना पोले यांनी सरकारी स्तरावर प्रस्ताव तयार करून पाठपुरावा केला जाईल, असे सूचित केले. या वेळी आमदार भालेराव यांनी उदगीरला रेल्वेची असलेली सुविधा व पाणी साठवणुकीसाठी असणारी तयारी पाहता रेल्वेने पाणी मिळणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी बोललो आहोत. त्यांनी या प्रस्तावास सहमती दर्शविली आहे. आता जिल्हाधिकारी पातळीवरून तत्काळ हालचाली अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
...
more...
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.