Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Mumbai Local - RailFanning nirvana.

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1392436
Posted: Mar 10 2015 (16:53)

5 Responses
Last Response: Mar 10 2015 (17:46)
Rail Fanning
11387 views
1

Mar 10 2015 (16:53)   12962/Avantika SF Express (PT) | INDB/Indore Junction (6 PFs)
 
guest   7 blog posts
Entry# 1392436            Tags   Past Edits
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग तीन वर्षात पूर्ण होणार
Deshdoot, Dhule, 9 March, 2015
शास्त्रोक्त पध्दतीने सर्व्हेक्षण करुन येत्या तीन वर्षात मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग पूर्ण केला जाईल अशी ग्वाही रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. या रेल्वे मार्गासाठी डॉ.भामरेंनी अभ्यासपूर्ण व सतत पाठपुरावा केला आहे असेही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही सांगितले. अशी माहिती खा.डॉ.सुभाष भामरे यांनी दिली. मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाबाबत माहिती देण्यासाठी खा.डॉ.भामरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला किशोर संघवी, अनुप अग्रवाल, प्रतिभा चौधरी, भारती माळी आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना खा.भामरे म्हणाले की, सातत्याने केंद्राकडे या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करीत आहे. हा रेल्वे मार्ग नक्कीच
...
more...
होईल व त्याचे श्रेय भाजपाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाणार आहे असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा महत्वाचा प्रकल्प पूर्ण करावयाचा असेल तर त्यासाठी आवश्यक निधी उभारावा लागेल. त्या अनुषंगाने येत्या पाच वर्षात ८.५ लाख कोटी इतका निधी उभा करण्याचा संकल्प केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेला आहे. त्यात महत्वाचे घटक राज्यांशी भागिदारी स्पेशल परपझ व्हेहीकल मॉडेलच्या माध्यमातून राज्य व रेल्वेच्या माध्यमातून फंड निर्माण करावयाचा आहे. त्यासाठी खासगी स्टेक होल्डरची सुध्दा मदत घ्यावयाची आहे. पीएसयू बरोबर भागीदारी करावयाची असून कोळसा, लोखंड, सिमेंटच्या कंपन्यांबरोबर भागीदारी करून स्वतंत्र रेल्वेरुळ सुरु करणे व त्यासाठी लागणारा निधी उभारणे. एफडीआय गुंतवणूक माध्यमातून जपान, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांकडून निधी उभारण्यात येणार आहे. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध होवू शकतो. प्रायव्हेट सेक्टरबरोबर पार्टनरशिप बाकीचे फायनन्स सोर्सेसकडे युरोपमध्ये भरपूर निधी पडला आहे. म्हणून त्यांच्याकडून अतिशय कमी व्याजाने पैसे रेल्वेसाठी उपलब्ध असून मोठा निधी रेल्वेला देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी रेल्वेचा अभ्यास पूर्ण केला असून त्यावरुन त्यांच्या लक्षात आले की, भारतीय रेल्वेची परिस्थिती बिकट असून डळमळीत झाली आहे. म्हणून पंतप्रधान मोदी व सुरेश प्रभूंनी यावर्षी अर्थसंकल्पात कुठलाही नवीन प्रकल्प मंजूर न करता येत्या दोन वर्षात रेल्वेची आर्थिक घडी व्यवस्थित करणे व रेल्वेचे बळकटीकरण, अद्यावत, विद्युतीकरण करणे व नवीन टेक्नोलॉजिचा उपयोग करुन रेल्वेचे उत्पन्न वाढविणे व क्षमता वाढविणे, मागील अपूर्ण व चांगले प्रकल्प पूर्ण करणे, मनमाड-इंदूर नवीन प्रकल्प हातात घेणे व यासाठी निधी उभा करणे यावर भर दिला आहे असे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, गेल्या २० वर्षात रेल्वेचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही प्रयत्न केले गेले नाहीत. आज रेल्वेला एक रुपया महसुल मिळाला तर त्यापैकी ९४ पैसे हे व्यवस्थापनासाठी खर्च होतात. ३०० रेल्वेमार्ग मंजूर केले आहेत. ते अपूर्ण असून त्यातील काही रेल्वेमार्ग हे ३० वर्षापासून रखडलेले आहेत ते पूर्ण करण्याचे आव्हान आहे व त्यासाठी पाच लाख कोटी खर्च अपेक्षित आहे. गेल्या १० वर्षात ९९ नवीन रेल्वे प्रकल्प घोषित झाले आहेत. व त्यातील फक्त एकच रेल्वे प्रकल्प पूर्ण झाला आहे. म्हणून सध्या असलेले रेल्वे रुळाची क्षमता वाढवावी. सध्यस्थितीत एकाच रेल्वे रुळावरुन पॅसेंजर, मालगाडी, शताब्दी, राजधानी धावते. त्यामुळे हे रेल्वेरुळ जिर्ण अवस्थेत आले आहेत. म्हणूनच रेल्वे रुळांचे दुपदरीकरण, तिपदरीकरण, चौपदरीकरण करण्यात येणार आहे असेही रेल्वे मंत्र्यांनी सांगितले असल्याचे खा.भामरे यांनी यावेळी नमूद केले.
click here
#ManmadIndore
#ManmadIndoreRail

Translate to English
Translate to Hindi

2 Posts

3995 views
1

Mar 10 2015 (17:11)
Anshul~
Anshul~   8064 blog posts
Re# 1392436-4              
Completion in 3 years looks difficult. But still IR should complete this route asap. It's being pending since long
Translate to English
Translate to Hindi

6335 views
1

Mar 10 2015 (17:17)
guest   7 blog posts
Re# 1392436-5              
Thanks for your reply. #ManmadIndoreRail which is prominent Rail route is pending since last many years.Govt is just making fool to the people residing at the project way.
Translate to English
Translate to Hindi

4222 views
1

Mar 10 2015 (17:33)
22109UndisputedKingofSupe
22109UndisputedKingofSupe   2569 blog posts
Re# 1392436-6              
But once Manmad Indore route & Khandwa-Indore GC completed, then many new services will start. Indore will get shortest possible route for Hyderabad n other South bound city.
Translate to English
Translate to Hindi

4641 views
1

Mar 10 2015 (17:46)
sachinindorewal^~
sachinindorewal^~   5370 blog posts
Re# 1392436-7              
3 yr no chance , u know that how railway work .......... they will laid with a speed of 10 km / year . so chance in 3 yr
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy