Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

हम उस देश के वासी हैं, जिस देश में Shiv Ganga दौड़ती है

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 2004199
Posted: Sep 27 2016 (21:41)

No Responses Yet
General Travel
2104 views
1

Sep 27 2016 (21:41)   CSN/Chalisgaon Junction (4 PFs)
 
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 2004199            Tags  
भुसावळ-नाशिक लोकलला ठेंगा
Maharashtra Times | Sep 27, 2016, 04.00 AM IST
Whatsapp Facebook Google PlusTwitter Email SMS
AAA म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भुसावळ- नांदगाव- नाशिक ही लोकल एक महिन्यात सुरू होणार असल्याची माहिती मध्य
...
more...
रेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी मागील वर्षी याच दिवशी पत्रकार परिषदेदत भुसावळ येथे दिली होती. मात्र अद्यापही या लोकलला मुहूर्त लागला नसून ती सुरू न झाल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तसेच, ही लोकल नक्की कधी सुरू होणार याबाबत संभ्रमच आहे.
पत्रकार परिषदेत ही माह‌िती देताना मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही तांत्रिक बाबींची सत्यता पडताळून न घेतल्याने त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. ही लोकल सेवा भुसावळ-नाशिक लोकलसेवा सुरू करण्यासाठी तांत्रिक चाचपणी सुरू करण्यात आली होती. या लोकलसेवेबाबत चालक व कर्मचाऱ्यांनी मुंबईत प्रशिक्षणही देण्यात आले होते. ही लोकलसेवा कुंभमेळ्याच्या काळातच सुरू होणार होती. मात्र, एक वर्ष होऊनही ती सुरू झाली नाही. यापुढे ती सुरू होईल, असे काहीही चिन्ह दिसत नाही.
अप-डाऊन करणाऱ्यांची सोय
भुसावळ-नाशिक ही लोकलसेवा सुरू झाली असती तर भुसावळसह जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड येथे थांबा घेणार होती. नाशिकसह धुळे जळगाव जिल्ह्यातील अप-डाऊन करणाऱ्या सुमारे साडेतीन हजार प्रवाशांची सोय झाली असती. ही लोकल भुसावळ येथे दाखलही झाली होती. तांत्रिक चाचणीनंतर ती प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होईल अस आशा होती मात्र ती फोल ठरली. भुसावळ नाशिक मार्गावर ट्रॅफिक जास्त असल्याने या मार्गावर ही लोकल सुरू होऊ शकत नाही असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy