Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

यमला-पगला-ट्रेन का-दिवाना - कार्तिक

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 3640478
Posted: Jul 18 2018 (20:47)

No Responses Yet
Travelogue
16619 views
1

Jul 18 2018 (20:47)   12157/Hutatma Express | SUR/Solapur (5 PFs)
psanga_sur^~
psanga_sur^~   5601 blog posts
Entry# 3640478            Tags   Past Edits
आपली हुतात्मा एक्सप्रेस झाली १७ वर्षाची
"कुठ चालला बे कडु?" "पुण्याला बे!" सकाळी ६.३० मिनिटांनी सोलापूरातुन निघणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेसमधला हा नेहेमीचा डायलॅाग, अाणि मग "तु कुट बे?" हा पुढचा प्रश्न "मी बी पुन्यालाच की, आनि कुट?" आता खरेतर पुण्याला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्यानंतर ही चर्चा तशी निरर्थकच पण सोलापुरकरांना ते कोण सांगणार? सोलापुरातुन पुण्याला जाणाऱ्या आणि सायंकाळी परत येणाऱ्या प्रवाशांची लाईफलाईन असलेली ही हुतात्मा एक्सप्रेस नुकतीच दि.१५ जुलै २‍०१८ रोजी अठराव्या वर्षात पदार्पण केली आहे. १७ वर्षे तक्रार न करता, न कुरकरता, अपघातात न सापडता या गाडीने सोलापूरकरांना सेवा दिलेली आहे. सुशील गायकवाडांनी चालु केलेल्या प्रथेप्रमाणे इंजिनची पुजा करुन, गार्ड व चालकाचा सन्मान करुन, केक कापुन या ट्रेनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला, अशीच कधीही अपघातग्रस्त न होता अविरत सेवा या
...
more...
ट्रेनकडुन घडावी अशा शुभेच्छा देऊन, योगायोगाने मी या क्षणाचा साक्षीदार झालो. तसा मी ही या ट्रेनने अनेकदा प्रवास केलेला आहे. बऱ्याचदा एसी चेअर कारने तर काही वेळा २ टायर सिटिंगने. गंमतीशिर असा हा प्रवास असतो. त्यातलेच काही मजेचे क्षण आपल्याशी शेअर करावेसे वाटले. आपला अनुभव याहुन वेगळा असेल अस मला वाटत नाही.
पुण्यात शिकणाऱ्या मुलामुलींसाठी आणि त्यांना भेटण्यासाठी सोलापुर-पुणे चकरा मारणाऱ्या मध्यमवर्गीय आईबापांसाठी ही ट्रेन म्हणजे वरदान आहे. सकाळी गडबडीत दुचाकीवर स्टेशनला पोहोचुन मुलीला डब्यात बसवुन कृतकृत्य होणारे अनेक बाप मी पाहिले आहेत. ट्रेन निघताना हळुच चोरुन डोळयात आलेले अश्रु टिपतानाची आई आणि बाप ईथेच पहायला मिळतात. काही महिन्यानंतर सरावलेले हेच बाप गेटवर मुलीला सोडुन बाय करतानाही ईथेच आढळतात. पण रात्री १०.३० वाजता येणाऱ्या या ट्रेनने येणाऱ्या लेकीची अातुरतेने वाट पहाताना मात्र हेच बाप ट्राफिक जाम करतात. एक छोटीशी स्ट्राली बॅग आणि पाठीवर हॅवरसॅक घेऊन झपाझप चालणाऱ्या अशा बऱ्याच मुलीही स्टेशनवर पहायला मिळतात याच वेळी. खुरटी दाढी, विटलेली जिन आणि टी शर्ट या पेहेरावात कानाला हेडफोन लावुन जगाशी आपला काय संबंध अशा अविर्भावात वावरणारी तरुण मुले आजुबाजुला असतातच मोठया संख्येने.
एकाच सिटवर दोन रिजर्व्हेशन्स अाली म्हणुन भांडणारी आणि नंतर माझं नंबर डी ८ मधे आहे म्हणुन सॅारी न म्हणता रुबाबात निघुन जाणारी मंडळीही याच ट्रेनमधे सापडतात. तुमच्या रिजर्व्हेशन्स असलेल्या सिटवर आरामात पथारी पसरुन तुम्हालाच थोडं अॅडजस्ट करा म्हणणारे महाभागही ईथेच दिसतात.
ट्रेन सुटल्या सुटल्या 'सुर नवा ,ध्यास नवा' स्टाईलने पुणे येईपर्यत घोरणारी मंडळीही पहायला मिळतात. तेरे मोबाईलमें मेरेसे अच्छा गाना कैसे? असा विचार करुन दोन पॅसेंजरमध्ये होणारी गाणी मोठयाने वाजविण्याची स्पर्धाही ईतर सर्वांना गुपचुप ऐकायला लागते याच ट्रेनमधे. अगदी ऐसी चेअर कारसुद्धा याला अपवाद नाही. फार वर्षानी भेटल्याच्या आवेशात मोठमोठयाने गप्पा मारणारी मंडळी, जणु आता पुन्हा या आयुष्यात भेट होते की नाही अशा अर्विभावात चार तास गप्पा मारुन शेजाऱ्यांना पिड पिडतात आणि सोलापुर स्टेशन आल्यानंतर एकाच दुचाकीवरुन घरी जातात. अपडाऊन करून आॅफिसची कामे करणारी, बिझनेस करणारी सरावलेली मंडळी मात्र निर्धास्तपणे अगदी एक मिनिट आधी येऊन ट्रेन पकडतात, पटकन स्थानापन्न होतात, मस्त झोप काढतात आणि ट्रेन थांबताच बॅग उचलुन उतरुनही जातात.
सोलापूर हे मेडीकल हब असुनही उपचारासाठी पुण्याला जाण्यात सोलापुरकरांना मोठेपणा वाटतो. तो मिरवायलाही त्यांना आवडतो. मग या ट्रेनमध्ये बसुन अमुक एका डॅाक्टरची अपाॅईंटमेंट मिळणे किती अवघड आहे, ती मी कशी खुबीने मिळविली याचे रसभरीत वर्णन केले जाते. एखादा डॅाक्टर कसा खडुस आहे किंवा एखादा कसा लुटतो असे चारचौघांना साक्षीला ठेवुन डॅाक्टरचे वस्त्रहरणही केले जाते. पूढच्या सीटवरुन मागे लांब बसलेल्या मारवाडी स्नेह्याला हाक मारुन "नींद हुअी गयो की नही" असे बिनदिक्कत विचारले जाते. मोठमोठ्या चकचकीत बॅग्ज आणि त्याला लटकणारे टॅग्ज दिसले की अोळखायचे मंडळी परदेशी निघाली आहेत. अचानक भेटणारी मित्रमंडळी हा प्रवास एंजॉय करतात. मनसोक्त गप्पा मारतात. आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी पुरेशी शिदोरी घेऊन ट्रेनमधुन उतरतात. सोलापूरात क्वचित भेटणारी मंडळीही या ट्रेनमधे शेजारी बसुन काही तास गप्पात गुंग होतात. नव्या बिझिनेस आयडिया शोधतात. त्यावर कामाला लागतात.
एकुणच सोलापुरकरांच्या आयुष्याचा एक अविभाज्य बनलेली आहे ही हुतात्मा एक्सप्रेस. हुतात्मा एक्सप्रेसच्या १८ व्या वाढदिवसानिमित्त सर्व सोलापुरकरांना ह‍ार्दिक शुभेच्छा...
लेखक : डॉ. सचिन जम्मा
लॅप्रोस्कपिक व जनरल सर्जन, सोलापूर
Source - Think Solapur FB Page

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy