दिवाळीत मुंबई, पुणे, हावडासाठी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये सर्वाधिक वेटिंग
सलग सुट्यांचा परिणाम : हावडाकडे जाणाऱ्या रेल्वे हाऊसफुल्ल
गोंदिया : दिवाळी काही दिवसांवर आली असतानाच रेल्वेच्या अनेक मार्गावरील आरक्षण फुल्ल झाले आहे. सलग सुट्यांमुळे अनेकांनी...
more... रेल्वे प्रवासाचा अगोदरपासून बेत आखला आहे. त्यामुळे रेल्वे तिकिटाचे वेटिंग १०० च्या पुढे गेले आहे. अनेकांनी खासगी वाहनेही बुकिंग करून ठेवली आहेत. पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी अन् कामानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक लोक मूळगावी येत असल्याने दिवाळीत रेल्वेला मोठ्या प्रमाणात गर्दी असणार आहे. दिवाळीदरम्यान मुंबई, पुणे आणि हावडाकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये सर्वाधिक वेटिंग आहे.
अशा आहेत दिवाळीत सलग सुट्या.
यंदा दिवाळी सण २२ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. शनिवार, दि. २२ ऑक्टोबरला (धनत्रयोदशी), रविवार २३ ऑक्टोबर, सोमवार, २४ (नरक चतुर्दशी), मंगळवार, २५ (अभ्यंगस्नान), २६ ऑक्टोबर (बलिप्रतिपदा, पाडवा, भाऊबीज) हे सण एकाच दिवशी आले आहेत.
निमशासकीय कार्यालयांना त्यामुळे शनिवार ते बुधवार हे पाच दिवस शासकीय सुटी असणार आहे. या सुट्यांमुळे अनेकांनी रेल्वे प्रवासाचा बेत आखला असल्याचे सांगितले.
सुरु असलेल्या रेल्वे गाड्या
गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस
गोंदिया- कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस
बिलासपूर-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस
समता एक्स्प्रेस
साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस
हटिया एक्स्प्रेस
खासगी वाहनांकडे ओढा
रेल्वे, एसटी गाड्यांचे तिकीट मिळत नसल्याने अनेकजण खासगी वाहनाने प्रवास करण्याचे नियोजन करीत आहेत. शिवाय खासगी चारचाकी गाड्या भाड्याच्या दरात घेऊन अनेकजण पर्यटक, धार्मिक स्थळाच्या भेटीसाठी जात आहेत. सलग सुट्यांमुळे लोक आता बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे प्रवास करणायांची संख्या वाढली आहे.
वेटिंग पोहोचले १५० च्या वर
मुंबई, पुणे, हावडा व अन्य महत्त्वाच्या शहराकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट वेटिंग मिळत आहे. दिवाळीत अनेक लोक पर्यटन, धार्मिक स्थळांना भेटी देतात. शिवाय मूळचे गोंदिया लोकपण कामानिमित्त बाहेरगावी असलेले लोक सणानिमित्त गोंदियाला येतात. त्यानंतर परत कामाच्या ठिकाणी जातात, त्यामुळे दिवाळीत रेल्वे गाड्यांचे वेटिंग वाढल्याचे दिसून येत आहे. हावडाकडे जाणाऱ्या सर्वच गाड्यांमध्ये दीडशेपेक्षा जास्त वेटींग असल्याने प्रवाशांना त्यांचे केलेले नियोजन रद्द करण्याची वेळ आली आहे. तर काही प्रवाशी इतर साधनाचा अवलंब करीत असल्याचे चित्र आहे.