Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Bhor Ghat section - ये ना ही है जन्नत, ना ही इधर है कोई पर्वत, यह जगह है हर एक Railfan का जो सबकी पूरी करे मन्नत - Sahil Khandare

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 755592
Posted: May 17 2013 (11:35)

2 Responses
Last Response: May 17 2013 (14:59)
General Travel
8340 views
0

May 17 2013 (11:35)   01245XX/Mumbai CSMT - Gorakhpur Summer Special | SUR/Solapur (5 PFs)
 
psanga_sur^~
psanga_sur^~   5601 blog posts
Entry# 755592            Tags  
चार तासांच्या प्रवासासाठी स्लिपर बर्थ असलेली व 17 तासांच्या प्रवासासाठी खुर्च्यांची बैठक व्यवस्था असलेली रेल्वेगाडी मध्य रेल्वेकडून सध्या सोडली जात आहे. त्यामुळे दूरच्या अंतरावरील प्रवाशांची गैरसोय होत असून, नजीकच्या अंतरावरील प्रवाशांना प्रत्येकी 80 ते 115 रुपयांचा आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
सुट्यांमुळे सध्या प्रवाशांची गर्दी होत आहे, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सुमारे 17 मार्गांवर जादा गाड्या सोडल्या आहेत. त्यातील पुणे-सोलापूर मार्गावरील (गाडी क्र. 01010) रेल्वे गाडी 265 किलोमीटर धावते. सायंकाळी चार वाजून 15 मिनिटांनी ही गाडी पुण्यातून सुटते व रात्री नऊच्या सुमारास सोलापूरला पोचते. तेथून सकाळी दहा वाजून 55 मिनिटांनी सुटते व दुपारी तीनच्या सुमारास पुण्यात येते. पुणे- नागपूर मार्गावरील गाडी (क्रमांक 01030) सुमारे 900 किलोमीटर अंतर पार करते. सकाळी पाच वाजून 20 मिनिटांनी ही जादा गाडी सुटते व
...
more...
रात्री अकरा वाजता ती नागपूरला पोचते. तेथून सकाळी अकरा वाजता ती निघते व पहाटे चार वाजता पुण्यात येते.
पुणे- सोलापूर या चार तासांच्या प्रवासासाठी मध्य रेल्वे स्लिपर क्‍लास असलेली रेल्वेगाडी सध्या सोडत आहे. त्यात फर्स्ट एसीचा 1 डबा, टू-टायर एसीचे तीन डबे व थ्री-टायर एसीचे दोन व द्वितीय वर्ग स्लिपर क्‍लासचे 8 डबे आहेत. मात्र, पुणे- नागपूर रेल्वेगाडीला खुर्च्यांची बैठक व्यवस्था असलेले आठ डबे आहेत. वस्तुतः पुणे- नागपूर हा तब्बल 17 तासांचा प्रवास आहे, तर सोलापूरचा चार तासांचा. नागपूर गाडीतील प्रवाशांना एवढा वेळ बसून प्रवास करणे शक्‍य होत नाही. त्यामुळे त्यांना स्लिपर बर्थ असलेल्या गाडीची आवश्‍यकता आहे, तर सोलापूरच्या प्रवाशांना खुर्च्यांची बैठक व्यवस्था चालू शकते. मात्र, मध्य रेल्वेने नेमके उलटे केले आहे.
त्यातच सोलापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना या हंगामी गाडीसाठी द्वितीय वर्ग स्लिपर क्‍लाससाठी 190 रुपये तिकीट द्यावे लागते. एरवी खुर्ची बैठक व्यवस्था असलेल्या गाडीसाठी त्यांना 110 रुपयेच तिकीट आहे. तसेच एरवीच्या एसी चेअर कारसाठी 390 रुपये तिकीट असते. मात्र, हंगामी गाडीतील थ्री-टायर एसीसाठी प्रवाशांना 505 रुपये द्यावे लागत आहेत. परिणामी पुणे-सोलापूर मार्गावरील प्रवाशांना जादा पैसे द्यावे लागत आहेत. नागपूरच्या गाडीतील प्रवाशांना मात्र गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Translate to English
Translate to Hindi

7913 views
0

May 17 2013 (14:44)
nageshdeshmukh24   32 blog posts
Re# 755592-1              
01010 RSA with 22133 ravivari divasbhar rake solapur yard Madhe thevnyapesha punyala holiday spacial suru keli aahe
Translate to English
Translate to Hindi

7451 views
0

May 17 2013 (14:59)
psanga_sur^~
psanga_sur^~   5601 blog posts
Re# 755592-2              
Yes I know it, RSA with SUR-YPR SF.
This news is printed in today's Pune Sakal.
Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy