Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Sri Jagannath Express is as good as Abada Prasad - Brandon Buffard

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 817303
Posted: Jul 30 2013 (10:02)

7 Responses
Last Response: Aug 19 2013 (12:20)
General Travel
7333 views
3

Jul 30 2013 (10:02)   22108/Latur - Mumbai CSMT SF Express (PT)
 
mblonare07
mblonare07   17 blog posts
Entry# 817303            Tags  
TULA NAHI NA MALA.................ANI GHAL...........
मुंबई-लातूर रेल्वे हैदराबादपर्यंत जाणार?
- - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2013 - 12:15 AM IST

Tags:
...
more...
latur-mumbai express, railway, latur
लातूर - मुंबई-लातूर ही रेल्वेगाडी नांदेडपर्यंत नेण्याचे नांदेडकरांचे प्रयत्न फसल्यानंतर आता ही रेल्वे हैदराबादला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यातून रेल्वेमंत्री बिदरवासीयांना खूष करणार आहेत. तर उदगीरकरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणीही पूर्ण होणार आहे.
तीस वर्षांच्या संघर्षानंतर लातूरकरांचे मोठ्या रेल्वेत बसण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यातूनच लातूर-मुंबई ही एक्‍स्प्रेस रेल्वे सुरू झाली होती. माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख असताना एकदा ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याचा घाट घालण्यात आला होता. पण कै. देशमुख यांच्यामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात ही रेल्वे नांदेडपर्यंत नेण्याची घोषणा रेल्वेमंत्र्यांकडून करण्यात नांदेडकर यशस्वी झाले होते. लातूरकरांनी या घोषणेला कडाडून विरोध केला. ही रेल्वे लातूरपर्यंतच ठेवावी अशी मागणी खासदार जयवंत आवळे, डॉ. जनार्दन वाघमारे, आमदार अमित देशमुख आदींनी रेल्वेमंत्र्यांकडे केली. यातून या रेल्वेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी बिदरचे मल्लिकार्जुन खर्गे हे रेल्वेमंत्री झाले. कै. देशमुख व श्री. खर्गे यांचे जवळचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधींच्या जीवात जीव आला. अनेकांनी त्यांच्या भेटी घेऊन ही रेल्वे येथेच ठेवण्याची मागणी केली. आता श्री. खर्गे यांनी ही रेल्वे बिदरपर्यंत नेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण बिदरऐवजी ही रेल्वे पुढे हैदराबादला नेणे सोईस्कर होणार असल्याचे रेल्वे बोर्डाचे मत आहे. त्यामुळे ही रेल्वे आता हैदराबादला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यात गेल्या काही वर्षांपासून ही रेल्वे उदगीरपर्यंत सोडावी अशी मागणी उदगीरकरांच्या वतीने केली जात होती. त्यामुळे ही रेल्वे हैदराबादपर्यंत गेली तर उदगीरकरांचीही सोय होणार आहे. ही रेल्वे नेमकी कोठे जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूरमार्गे नागपूर-मुंबई रेल्वे
मुंबई-लातूर ही रेल्वे नांदेडऐवजी हैदराबादला नेण्यात येणार आहे. त्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ही रेल्वे बिदरपर्यंत न्यावी अशी आमची मागणी होतीच. ती आता पुढे जात आहे. तसेच नागपूर-मुंबई ही नवीन रेल्वे लातूरमार्गे लवकरच सुरू करण्याचे आश्‍वासन रेल्वे बोर्डाने दिले आहे.
-शिवाजी नरहरे, जिल्हाध्यक्ष, मराठवाडा जनता विकास परिषद, लातूर
1

Translate to English
Translate to Hindi

4 Public Posts - Tue Jul 30, 2013

3344 views
0

Aug 06 2013 (20:15)
guest   769 blog posts
Re# 817303-5              
nival murkhapana ahe CR cha ani RB cha pan
Translate to English
Translate to Hindi

1 Public Posts - Wed Aug 07, 2013

1 Public Posts - Mon Aug 19, 2013
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy