Full Site Search  
Mon Jan 22, 2018 09:57:51 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;

JSP/Jayasingpur (2 PFs)
जयसिंगपुर     जयसिंगपुर

Track: Single Diesel-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 20
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Gandhi Bunglow, Jaysingpur
State: Maharashtra
add/change address
Elevation: 550 m above sea level
Zone: CR/Central
Division: Pune
 
 
No Recent News for JSP/Jayasingpur
Nearby Stations in the News

Rating: /5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)

Nearby Stations

NMGT/Nimshirgaon Tamdalge 7 km     MRJ/Miraj Junction 12 km     HTK/Hatkanagale 14 km     VRB/Vishrambag 17 km     BLWD/Bolwad 18 km     SLI/Sangli 19 km     VJR/Vijaynagar 20 km     RKD/Rukadi 21 km     BDK/Bedag 23 km     MDVR/Madhavnagar 23 km    

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
Jan 27 2016 (11:31)  रेल्वेमार्गावरील ढिगारा कोसळून पाच जखमी (www.lokmat.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 255181     
   Past Edits
Jan 27 2016 (11:31AM)
Station Tag: Jayasingpur/JSP added by ameyambre/16020

Jan 27 2016 (11:31AM)
Station Tag: Jayasingpur/JSP added by ameyambre/16020
Stations:  Jayasingpur/JSP  
 
 
मिरज : मिरज-जयसिंगपूरदरम्यान रेल्वेमार्गावर अंकली येथे रेल्वेफाटकाखालून भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू असताना, शनिवारी मातीचा ढिगारा पडून रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदारासह पाचजण जखमी झाले. जखमींना मातीच्या ढिगाऱ्यातून काढून मिरजेतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक सुरळीत होण्यास तीन तास विलंब झाला.
मिरज विभागाचे रेल पथनिरीक्षक सायमन पुट्टाप्पा, सहायक रेल्वे अभियंता समीर सातारकर, मुकादम हणमंता यल्लाप्पा, ठेकेदार व्यंकटेश हणमंता भंडारी (सर्व रा. मिरज) आणि एक मजुराचा जखमीत समावेश आहे.
मिरज ते कोल्हापूरदरम्यान मानवरहित रेल्वे फाटक बंद करून वाहतुकीसाठी भुयारी मार्ग तयार करण्यासाठी गेले तीन आठवडे मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. अंकली
...
more...
येथे गेट क्रमांक चारजवळ शनिवारी मध्यरात्री भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरू होते. जेसीबीने रेल्वे मार्गाखालील माती खोदून मोठ्या आकाराचे सिमेंट ब्लॉक बसविण्यात येत होते. जेसीबीने काढलेल्या मातीचे ढीग रेल्वे मार्गाशेजारी होते.
मध्यरात्री चार वाजता सिमेंट ब्लॉक रेल्वेमार्गाखाली ओढण्यात येत असताना ढिगाऱ्यावरील कामगारांच्या धक्क्याने मातीचा ढिगारा कोसळला. ढिगाऱ्याजवळ रेल्वे अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार व मजूर असे अकराजण थांबले होते. ढिगारा अंगावर पडल्याने पाचजण ढिगाऱ्याखाली अडकले. जेसीबीने माती बाजूला काढून अडकलेल्या पाचजणांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्यावर मिरजेत खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
भुयारी मार्गाचे काम सुरू असताना रेल्वे अधिकारी कर्मचारी अपघातात जखमी झाल्याच्या घटनेमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली होती. मिरजेतील रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अपघाताच्या घटनेमुळे रेल्वे वाहतूक सुरू होण्यास तब्बल तीन तास विलंब झाला. सकाळी सहाऐवजी नऊ वाजता मार्गावरील रेल्वे वाहतूक सुरू झाली. (वार्ताहर)
दुरुस्तीस विलंब : प्रवाशांचे झाले हाल
शनिवारी मध्यरात्री एक ते सकाळी सहापर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र अपघातामुळे सकाळी नऊ वाजता रेल्वे वाहतूक सुरू झाली. कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस पहाटे साडेचार, महालक्ष्मी एक्स्प्रेस मिरजेत थांबविण्यात आल्या होत्या. कोल्हापुरातून येणारी कोयना एक्स्प्रेस जयसिंगपूर येथे थांबविण्यात आली होती. भुयारी मार्गाचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने सकाळी नऊनंतर मिरज-कोल्हापूर वाहतूक सुरळीत झाली. रेल्वेमार्ग सुरू होण्यास विलंब झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.
मिरज-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक बंद
शनिवारी मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत मेगाब्लॉकमुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद होती. मेगाब्लॉक व अपघातामुळे सकाळी सह्याद्री एक्स्प्रेस व महालक्ष्मी एक्स्प्रेस तीन तास विलंबाने कोल्हापूरला रवाना झाली. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेत थांबविण्यात आली होती. कोल्हापुरातून सुटणारी पुणे पॅसेंजर व हैदराबाद एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात आली.
Jan 16 2016 (11:37)  मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक रविवारी बंद (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 254123   Blog Entry# 1712371     
   Past Edits
Jan 16 2016 (11:37AM)
Station Tag: Hatkanagale/HTK added by ameyambre/16020

Jan 16 2016 (11:37AM)
Station Tag: Kolhapur CSMT/KOP added by ameyambre/16020

Jan 16 2016 (11:37AM)
Station Tag: Jayasingpur/JSP added by ameyambre/16020

Jan 16 2016 (11:37AM)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by ameyambre/16020
 
 
मिरज : जयसिंगपूर ते हातकणंगलेदरम्यान रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी शनिवार, दि. १६ च्या मध्यरात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत मेगाब्लॉकमुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे रविवारी सकाळी सह्याद्री एक्स्प्रेस, सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेपर्यंत धावणार आहे. कोल्हापुरातून सुटणारी पुणे पॅसेंजर व हैदराबाद एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात येणार आहे. यामुळे कोल्हापुरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
जयसिंगपूर ते हातकणंगलेदरम्यान रेल्वेमार्ग दुरुस्तीसाठी शनिवारी मध्यरात्री एक ते रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद करण्यात येणार आहे. मेगाब्लॉक असल्यामुळे शनिवारी रात्री कोल्हापूरला जाणारी सांगली-कोल्हापूर पॅसेंजर मिरजेतच थांबणार आहे. रविवारी सकाळी कोल्हापूर-पुणे पॅसेंजर मिरजेतूनच पुण्याला रवाना होणार आहे. मुंबईतून कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्स्प्रेस मिरजेतच थांबविण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस मिरजेत थांबून विलंबाने कोल्हापूरला पाठविण्यात येण्याची शक्यता आहे.
दोन
...
more...
आठवड्यापूर्वी याच ठिकाणी दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. मात्र काम अपूर्ण असल्याने रविवारी पुन्हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (वार्ताहर)
प्रवाशांची गैरसोय
रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी आठनंतर मिरज-कोल्हापूर वाहतूक सुरळीत होणार आहे. पहाटे साडेचार वाजता मिरजेत येणारी सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरजेतच थांबणार असून हीच गाडी कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस म्हणून मिरजेतूनच हैदराबादला जाणार आहे. कोल्हापुरातून सकाळी सुटणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर मिरजेतून जाणार असल्याने कोल्हापुरातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

4424 views
Jan 16 2016 (12:24)
12649⭐️ KSK ⭐️12650^~   16927 blog posts   7705 correct pred (69% accurate)
Re# 1712371-1            Tags   Past Edits
Block on KOP-MRJ section, on this Sunday Sayhadri, SUR-KOP will be terminated at MRJ and KOP-Pune Pass., KOP-HYB EXP will originate from MRJ
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.