Full Site Search  
Fri Jul 28, 2017 00:23:38 IST
PostPostPost Stn TipPost Stn TipUpload Stn PicUpload Stn PicAdvanced Search
Large Station Board;

PMP/Pimpri (2 PFs)
     पिंपरी

Track: Double Electric-Line

Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 56
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Off Pimpri-Chinchwad Link Road, Pimpri, Pune 411018
State: Maharashtra
Elevation: 569 m above sea level
Zone: CR/Central
Division: Pune
No Recent News for PMP/Pimpri
Nearby Stations in the News

Rating: 3.0/5 (7 votes)
cleanliness - poor (1)
porters/escalators - good (1)
food - average (1)
transportation - average (1)
lodging - good (1)
railfanning - excellent (1)
sightseeing - n/a (0)
safety - average (1)

Nearby Stations

CCH/Chinchwad 2 km     KSWD/Kasarwadi 3 km     AKRD/Akurdi 5 km     DAPD/Dapodi 6 km     KK/Khadki 8 km     DEHR/Dehu Road 10 km     SVJR/Shivajinagar 12 km     PUNE/Pune Junction 14 km     BGWI/Begdewadi 14 km     BGW/Begdewadi 14 km    

Station News

Page#    Showing 1 to 8 of 8 News Items  
Feb 28 2017 (10:45)  ‘हॅरिस’ रेल्वे पुलाची डागडुजी सुरू (beta1.esakal.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 294967     
   Tags   Past Edits
Feb 28 2017 (10:45)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
पिंपरी - दापोडी-बोपोडीला जोडणाऱ्या हॅरिस पुलालगत असणाऱ्या रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. येत्या २० दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.
खडकीजवळील रेल्वे पुलाखाली मजबुतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत सहा ठिकाणचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित २२ ठिकाणचे काम येत्या २० दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रेल्वेच्या पुलावरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे, मालगाड्या, लोणावळ्याकडे जाणाऱ्या लोकलची वाहतूक होते. रेल्वे वाहतुकीमुळे या पुलाची देखभाल करणे आवश्‍यक असते. त्यामुळे हे काम हाती घेतल्याचे झंवर यांनी सांगितले.
Jun 11 2016 (11:23)  कासारवाडीजवळ रेल्वेतून पडून प्रवाशाचा मृत्यू (www.lokmat.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 270685     
   Tags   Past Edits
Jun 11 2016 (11:23AM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
पिंपरी : लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना कासारवाडी ते दापोडी रेल्वेस्थानकाच्या दरम्यान घडली. रेल्वेखाली सापडून अपघातात मृत्यू होण्याची दोन दिवसातील ही तिसरी घटना आहे.
गुरुवारी दुपारी ३च्या सुमारास कासारवाडी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे पोलिसांना अंदाजे ४० वर्षे वयाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृत्यू झालेल्या प्रवाशाची ओळख पटलेली नाही. दोन दिवसांपूर्वी कासारवाडी आणि पिंपरी रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना, झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. संजय दिगंबर राठोड (वय २५, रा. डुडुळगाव) असे एकाचे नाव आहे, तर
दुसऱ्याची ओळख पटलेली नव्हती. दोन दिवसांत घडलेल्या रेल्वे अपघाताच्या घटनेत
...
more...
गुरुवारी तिसरा बळी गेला आहे.
Jun 08 2016 (12:01)  रेल्वे अपघातात दोन ठार (www.pudhari.com)
back to top
Crime/AccidentsCR/Central  -  

News Entry# 270340     
   Tags   Past Edits
Jun 08 2016 (12:01PM)
Station Tag: Pimpalgaon/PMGN added by ameyambre/16020

Jun 08 2016 (12:01PM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
पिंपरी :
पिंपरी आणि कासारवाडी येथे मंगळवारी लोहमार्ग ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने दोघांचा मृत्यू झाला. कासारवाडी येथे झालेल्या अपघातात संजय दिगंबर राठोड (25, रा. डुडुळगाव, मूळ रा. परभणी) याचा मृत्यू झाला. तर पिंपरी येथे झालेल्या अपघातातील तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. संजय राठोड हा मंगळवारी सकाळी लोहमार्ग ओलांडत असताना पुण्याहून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्‍या लोकलची धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजयचा जागीच मृत्यू झाला. तर पिंपरीतील अपघातात 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या अंगावर पांढरा शर्ट, निळी जिन्स पॅन्ट असे या तरुणाचे वर्णन आहे.तरुणाविषयी कोणास माहिती असल्यास 9764083391 या क्रमांकावर संपर्क साधावा.
Feb 23 2016 (11:07)  पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र डबे वाढविण्याची आवश्यकता (www.lokmat.com)
back to top
IR AffairsCR/Central  -  

News Entry# 258416   Blog Entry# 1747007     
   Tags   Past Edits
Feb 23 2016 (11:07AM)
Station Tag: Chinchwad/CCH added by ameyambre/16020

Feb 23 2016 (11:07AM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
पिंपरी : औद्योगिकीकरणामुळे पिंपरी-चिंचवड शहरात लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण झाले आहे. त्याचबरोबर वाहतुकीचे चांगले जाळे असल्याने येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पिंपरी - चिंचवड शहरातील चिंचवड हे मध्यवर्ती स्थानक आहे. परंतु, लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या येथे थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे, लोणावळा, कल्याण या ठिकाणी उतरुन पुढील प्रवास करावा लागत आाहे. पुणे - मुंबई सिंहगड एक्सप्रेसला जादा बोगी असण्याची गरज आहे.
पिपंरी व चिंचवडसाठी सद्या एकच बोगी आहे. ती पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र असण्याची गरज आहे. पिंपरी व चिंचवडसाठी बोगी एकत्र असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई - कोयना एक्सप्रेस २१ डब्यांची आहे. त्यात गर्दी होत आहे. डब्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी या स्थानकांचा
...
more...
विकास होण्याची गरज आहे.
मुंबई-चेन्नई एक्सप्रेस, लोकमान्य टिळक ते हुबळी एक्सप्रेस, पुणे - एर्नाकुलम एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस (पुणे-सोलापूर), मुंबई - लातूर एक्सप्रेस, अजमेर एक्सप्रेस, मुंबई - बेंगलोर एक्सप्रेस, अहिंसा एक्सप्रेस (पुणे- अहमदाबाद), डेक्कन एक्सप्रेस (मुंबई-पुणे), प्रगती एक्सप्रेस (पुणे-मुंबई) या गाड्या चिंचवड स्थानकावर थांबण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
चिंचवड ते रोहा रेल्वेमार्गाची नुसतीच घोषणा
चिंचवड ते रोहा ९० किलोमीटर रेल्वे मार्गाची घोषणा तत्कालीन रेल्वे राज्यमंत्र्यांनी १९९६ ला केली होती. हा मार्ग हिंजवडी , पौड, मुळशी, बोरिवली, हेतवण, कोलाड, रोहा असा करण्यात येणार होता. त्यात २५ लहान व मोठे बोगदे, १०३ छोट्या बोगद्यांचा समावेश होता. या मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण होऊनही या मार्गाच्या कामास सुरुवात होऊ शकली नाही. ती फक्त घोषणाच राहिली.
शहरातील प्रत्येक स्थानकानुसार प्रवासी समितीची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या तुलनेत रेल्वे गाड्यांची व डब्यांची संख्या वाढत नाही. लोकलच्या फेऱ्यांत वाढ होण्याची गरज आहे. अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुणे व पिंपरी - चिंचवड शहराच्या दृष्टीने चिंचवड स्थानकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चिंचवड स्थानकाचा विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करणे गरजेचे आहे.
- गुलामअली भालदार, अध्यक्ष, प्रवासी संघ, चिंचवड

2952 views
Feb 23 2016 (11:13)
Why not three languages in Aadhar~   4284 blog posts   324 correct pred (68% accurate)
Re# 1747007-1            Tags   Past Edits
We will get at-least 2-3 train halts at CCH.

3009 views
Feb 23 2016 (11:21)
गुलाबी आँखे जो तेरी देखी*^~   3089 blog posts   10045 correct pred (76% accurate)
Re# 1747007-2            Tags   Past Edits
Very long pending demand. People facing problems to reach pune jn. Few trains should hault at Chicnhwad.
Feb 11 2016 (12:06)  रेल्वेस्थानकांवर ‘तेजस’ पथकाची नजर (www.lokmat.com)
back to top
Commentary/Human InterestCR/Central  -  

News Entry# 256887     
   Tags   Past Edits
Feb 11 2016 (12:06PM)
Station Tag: Pimpri/PMP added by ameyambre/16020

Posted by: Amey Ambre~  1942 news posts
पिंपरी : खडकी ते लोणावळा दरम्यानच्या स्थानकांवर अस्वच्छता पसरविणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी ‘तेजस’ पथक तैनात करण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने पुणे स्थानकासाठी हे पथक तैनात केले होते. या पथकाने चांगली कामगिरी केली. त्यांना आलेले यश लक्षात घेऊन खडकी ते लोणावळ्यादरम्यान आणखी एक पथक तैनात करण्यात आले.
विनातिकीट प्रवास व स्थानकाच्या परिसरात अवैधरीत्या वाहने लावणाऱ्यांबरोबरच आता स्थानकाच्या परिसरात धूम्रपान करणारे व अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर सध्या जोरदार कारवाई करण्यात येत आहे. रेल्वेचा वाणिज्यीक विभाग व रेल्वे सुरक्षा दलाचा सहभाग असलेल्या तेजस पथकाची मागील महिन्यात पुण्यात स्थापना करण्यात आली होती. या पथकाकडून जोरदार करण्यास सुरुवात करण्यात आली. या पथकाने ९ ते ३१ जानेवारी या कालावधीत केलेल्या कारवाईमध्ये पुणे विभागात स्थानकावर अस्वच्छता करणाऱ्या ५१७ जणांना पकडण्यात आले. विनातिकीट प्रवास करणारे ४७२, अवैधरीत्या वाहने उभी करणारे
...
more...
१३५ व स्थानकावर धूम्रपान करणाऱ्या चार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. विविध कारणांस्तव ११२८ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ८ फेब्रुवारीपासून खडकी ते लोणावळादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या, अस्वच्छता पसरविणाऱ्या, तसेच धूम्रपान करणाऱ्यांवर तेजस पथकाने कारवाई केली. या पथकाने सुमारे ३० लोकांकडून ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. व्यवस्थापक बी. के . दादाभोय, गौरव झा यांच्या मार्गदर्शनाखाली संजयकुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
विनातिकीट प्रवासी संकटात
खडकी ते लोणावळादरम्यान
१४ रेल्वेस्थानके आहेत. या रेल्वेस्थानकांवर नेहमीच ठिकठिकाणी पडलेला कचरा, पान-गुटखा खाऊन मारलेल्या पिचकाऱ्या असे चित्र दिसत असते. मात्र, अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी तेजस पथक नेमण्यात आले आहे. याचबरोबर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांनाही चाप बसणार आहे.
पुण्यात जानेवारी महिन्यात रेल्वेच्या वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दलाने संयुक्त तेजस पथक तैनात केले. या पथकाला आलेल्या यशामुळे अजून एक पथक तयार केले. खडकीच्या पुढील भागातील रेल्वेस्थानकांवर या पथकामार्फत कारवाई केली जाईल. सात जणांचा सहभाग असलेले हे पथक आहे.
- डी. विकास, विभागीय आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल
Page#    Showing 1 to 8 of 8 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom


Go to Desktop site
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.