सिकंदराबाद - मनमाड ही विशेष रेल्वे मंगळवारपासून सुरू....
परभणी, दि. 29 (प्रतिनिधी) ः दक्षिण मध्य रेल्वेने सिकंदराबाद - मनमाड (क्र. 07064/63) ही विशेष रेल्वे मंगळवारपासून (दि.एक) सुरू होणार असल्याची माहिती नांदेड येथील विभागीय कार्यालयाने एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
सिकंदराबाद - मनमाड (क्र.07064) ही विशेष रेल्वे सिकंदराबाद येथून सायंकाळी सहा वाजून 50 मिनिटांनी मिघणार आहे. कामारेड्डी येथे रात्री आठ वाजून 38 मिनिटांनी, निजामाबाद येथ साडेनऊ...
more... वाजता, बासर येथे रात्री दहा वाजून पाच मिनिटांनी, धर्माबाद येथे दहा वाजून 19 मिनिटांनी, उमरी येथे रात्री 11 वाजून 13 मिनिटांनी, मुदखेड येथे 11 वाजून 43 मिनिटांनी, नांदेड येथे रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी, पूर्णा येथे रात्री 12 वाजून 58 मिनिटांनी, परभणीत दोन वाजून 13 मिनिटांनी पोचणार आहे. पुढे जालना येथे सकाळी चार वाजून 20 मिनिटांनी पोचेल, औरंगाबादेत साडेपाच वाजता, लासूर येथे सहा वाजून 20 मिनिटांनी, रोटेगाव येथे सहा वाजून 44 मिनिटानी, नगरसोल येथे सात दहा वाजता तर मनमाड येथे सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी पोचणार आहे.
परतीच्या प्रवासात मनमाड - सिकंदराबाद (क्र.07063) ही विशेष रेल्वे मनमाड येथून रात्री आठ वाजून 50 मिनिटांनी निघेल, नगरसोल येथे नऊ वाजून 15 मिनिटांनी, रोटेगावात नऊ वाजून 39 मिनिटांनी, लासूर दहा वाजता, औरंगाबादमध्ये दहा वाजून 40 मिनिटांनी, जालनात 11 वाजून 45 मिनिटांनी, परभणीत एक वाजून 38 मिनिटांनी, पूर्णा येथे दोन वाजून 18 मिनिटांनी, नांदेडमध्ये सकाळी तीन वाजून तीन मिनिटांनी, मुदखेडमध्ये सकाळी तीन वाजून 53 मिनिटांनी, उमरीत चार वाजून 18 मिनिटांनी धर्माबाद येथे चार वाजून 44 मिनिटांनी, बासार येथे 4 वाजून 54 मिनिटांनी, निजामाबाद येथे पाच वाजून 28 मिनिटांनी, कामारेड्डी येथे सहा वाजून 16 मिनिटांनी, वाडीयाराम येथे सात वाजता, तर सिकंदाराबाद येथे सकाळी आठ वाजून 50 मिनिटांनी पोचणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.