Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

हाटे-बाजारे एक्सप्रेस : चलती - फिरती मछली बाजार - Piyush Singh

Search Forum
Post PNR
Medium; Front-facing; Small TB; Outside of Train; Standing at Station;
Entry# 4245995-0
Availability Calendar
Search KYN to KSRA
PDF Download

95425/N33 / Mumbai CSMT - Kasara SemiFast Local
मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा अर्धतेज लोकल

KYN/Kalyan Junction --> KSRA/Kasara

Updated: Nov 11 2019 (21:45) by ForeverRailfan^~
Nov 11 2019 (21:45)
News
PNR
Forum
Time-Table
Availability
Fare Chart
Map
Arr/Dep History
Trips
Gallery
ΣChains
X/O
Timeline
Train Pics
Tips

Train Forum

Page#    1 blog entries  
Social
9575 views
0

Mar 20 2018 (22:30)   95425/N33 / Mumbai CSMT - Kasara SemiFast Local
Punekar^~
Punekar^~   5723 blog posts
Entry# 3222797            Tags  
source: click here
11.05 ची कसारा फास्ट. ट्रेन तशी रिकामी होती. दारात दोन बायका बसल्या होत्या. दोघींनीही पिवळी साडी काळे ब्लाऊज घातले होते. त्या केटररकडे कामावर असाव्यात आणि एखाद लग्न किंवा एखादं फंक्शन आटपून घराकडे निघाल्या असाव्यात. (असं मला वाटतं) दरवाजात दोघी डोळे लावून बसल्या होत्या. एकीच्या कानात हॅण्डस फ्री होते.
घरी निघालेल्या एका भाजीवालीने उरलेल्या भाज्या विकण्यासाठी डब्यात फेऱ्या सुरू केल्या.. ए... दस दस..कोई भी सब्जी दस दस.
डब्यातल्या
...
more...
बायकांनी भाजी घेतली. माझ्या समोरच्या बाईने ब्रॉकली घेताना थोडी घासाघीससुद्धा केली.
तिला भाजीवालीने सुट्टे पैसे दिले त्यानंतर ती अचानक पैसे शोधू लागली. तिचे पैसे पडले असं ती सांगत होती. माझ्या शेजारच्या सीटवरच्या बाईने ते पैसे घरंगळत जाताना पाहिले होते. तिने तिला दरवाज्यात 'खाली बसलेल्या बायकांना विचार' असं सुचवलं.
त्या पिवळ्या साडीतल्या एकीने दुसरीला खुणवलं 'कॉईन ठेवलं ते ती शोधतेय. तिचं आहे' तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं.पुन्हा डोळे लावून झोपली.
आता खाली बसलेल्या दोघी. दरवाजातल्या बाईने कॉईन उचललं असं सुचवणारी ती बाई आणि जिचं कॉईन हरवलं ती, अशा चौघींमध्ये चुळबूळ सुरू झाली. दरवाजातल्या बाईला 'माझे पैसे घेतले का' कॉईन हरवलेल्या बाईने विचारलं..
दरवाजातली ती हेडफोन कानात असलेली बाई - ते पैसे तुझे होते? नोट होती ?
पैसे हरवलेली बाई - तु पैसे घेतले का?
दरवाजातली बाई - नोट होती की नाणं?
इतक्यात भाजी विकणाऱ्या बाईनेही मध्ये पडत - पैसे घेतलेस तर दे.
दरम्यान दरवाजातली बाई ब्लाऊजमध्ये हा एकदा दहाचं नाणं काढून एकदा दहाची नोट काढून पैसे तुझे का असं पैसे हरवलेल्या बाईला विचारत होती..
पैसे हरवली ती बाई थोडी वयाने होती. चेहऱ्यावरुन थकलेली वाटत होती. काय बोलावं हे तिला कळत नव्हत.
भाजीवालीने मात्र आता पैसे उचलल्याचा संशय असलेल्या बाईला चांगलं धारेवर धरलं. पैसे दिसले की उचलायचे का? काय बंगला बांधणार आहेस?
दरवाजातल्या बाईने 'उडून आलेल्या पैशातून बंगला नाही होत. पैसे तुझे आहे का ? कशाला बोलते ? तू गप्प बस ना वगैरे आरडाओरड सुरू केली. मुंब्रा आल्यावर त्या दोघी उतरुन गेल्या..
आता मात्र पैसे गेलेली बाई शांत झाली. तिचे पैसे गेले आणि दरवाजातल्या बाईने घेतले हे तिला सांगणारी बाईही उतरुन गेली होती. भांडणाचा आवाज थांबला
कॉईनचा उल्लेख झाला म्हणजे 1 ते 10 रुपयांपर्यंतचं नुकसान झालेलं असावं. कारण समोरच्या बाईने 40 रुपयाची भाजी घेतली होती. भाजीवलीकडून ब्रॉकली 20 ऐवजी 15 ला मागत होती. तेवढा त्यांचा व्यवहार मी पाहिला होता. तिचे पैसे पडताना आणि ते समोरच्या बाईने उचलताना मी पाहिले नव्हते. पण ज्या अर्थी 10 ची नोट किंवा 10 चं कॉईन काढून ती बाई सारखं विचारच होती त्याअर्थी 10 चं कॉईन पडलेलं असावं इतकं खरं होतं.
एकीकडे 5 रुपये कमी करण्यासाठी भाजीवालीकडे भाव करणाऱ्या बाईने 10 रुपये असे सहजी जाऊ द्यावे. दुसरीकडे मरमरुन थोडे पैसे जोडणाऱ्या बाईने 10 रुपयेसुद्घा लपवावे?
एकीकडे हक्कासाठी भांडण्याची ताकद नाही किंवा 10 गेले ही भावना. तर दुसरीकडे इतके मिळाले तर ते का सोडा आणि मी दिले तक मी घेतले हे कळेल अशी दुहेरी भावना होती.
असो पैशाबाबत समाजात दिसणारे दोन गट त्या प्रवासात दिसले. एकीकडे पैसा गेल्याचं दु:ख नाही. दुसरीकडे कितीही मिळाला तरी कमीच असणार होता.
ज्याच्याकडे काही नसतं तो ते मिळवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतो..दरवाज्यात बसलेल्या बाईच्या चेहऱ्यावर 10 चा ठोकळा मिळाल्याचा आनंद गाडीतून उतरताना लपवला नाही.

Translate to English
Translate to Hindi
Page#    1 blog entries  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy