Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

Everyone is a gangster (Rajdhani, Shatabdi, Tejas) until the real Gangsta (Vande Bharat) walks in 😂 - Mushfique Khalid

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 1551829
Posted: Jul 27 2015 (18:18)

No Responses Yet
1 Followers
Info Update
2273 views
1

Jul 27 2015 (18:18)   PUNE/Pune Junction (6 PFs)
 
guest   4394 blog posts
Entry# 1551829            Tags  
Pune Railway Station Building completed 90 years today (Monday, 27-Jul-2015)! More details in Marathi click here
पुणे : ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे रेल्वे स्थानकाच्या इमारतीला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या ९० वर्षांत पुणे रेल्वे स्थानकात अनेक बदल झाले असले, तरी ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे. देशातील ‘ए १’ दर्जा मिळालेल्या मोजक्या रेल्वे स्थानकांत पुणे स्थानकाचाही समावेश आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवेश केल्यानंतर समोरच ऐतिहासिक वास्तू नजरेस पडते. आशिया खंडातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे यादरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये धावली. त्यानंतर पुढे ही रेल्वे ठाणे ते कल्याण
...
more...
(१ मे १८५३), कल्याण ते पलसदरी (१२ मे १८५६), पलसदरी ते खंडाळा (मार्च १८६१) अशी धावली. पुढे खंडाळा ते पुणे हा मार्ग तयार करून १४ जून १८५८ ला पुण्यात पहिली रेल्वेगाडी आली. तेव्हापासून पुण्याचे महत्त्व वाढत गेले. त्यानंतर ब्रिटिशांनी मुंबईतील व्हिक्टोरिया टर्मिनस स्टेशनचा (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) विकास करीत असताना पुणे रेल्वे स्थानकातही सुधारणांना प्राधान्य दिले. ब्रिटिश लष्कराच्यादृष्टीने पुणे हे शहर महत्त्वाचे होते. शेती, उद्योगक्षेत्र, व्यापार यांना उत्तेजन देण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकाला अधिक सुविधा देण्याची तरतूद १८८५-८९ मध्ये करण्यात आली. त्यानुसार सुविधा, गाड्यांची संख्या वाढत गेली.
पुणे स्थानकाच्या इमारतीचा पहिला आराखडा १९१५ मध्ये तयार झाला. तर प्रत्यक्ष कामाला १९२२ मध्ये सुरूवात झाली. त्यानंतर तीन वर्षांत स्थानकाची ऐतिहासिक वास्तू उभी राहिली. त्या वेळी संपूर्ण इमारतीला ५ लाख ७९ हजार ६६५ रुपये खर्च आला. ही वास्तू व लाहोर जंक्शनचा आराखडा सारखाच आहे. या ब्रिटिशकालीन वास्तूला सोमवारी ९० वर्षे पूर्ण होत आहेत. या ९० वर्षांच्या कालखंडात पुणे रेल्वे जंंक्शनने अनेक चढउतार पाहिले. दररोज शेकडो गाड्यांचे फेऱ्या, तर लाखो प्रवाशांची ये-जा असलेल्या या स्थानकाने देशांतही नावलौकिक मिळवला आहे.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy