Search Forum
Blog Entry# 1562391
Posted: Aug 11 2015 (11:58)
No Responses Yet
No Responses Yet
अकोला : अकोला ते खांडव रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तनाचे काम वन विभागाच्या आडकाठडीमुळे रखडले आहे. हा अडथळा दूर करण्यासाठी प्रयत्न करू आणि दीड महिन्यात हे काम मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार संजय धोत्रे आणि अकोला जिल्ह्यातील आमदारांना दिले.
पूर्णापर्यंत झालेल्या गेज परिवर्तनानंतर अकोला शहराला १२ नवीन गाड्या मिळाल्यात. त्यामुळे खंडव्यापर्यंतचे गेज परिवर्तन लवकारत होणे आवश्यक आहे. त्यासाठी खासदारांसह अधिकारी व आमदारांनी सोमवारी मुंबई येथे वित्त व वनमंत्र्यांच्या दालनात त्यांची भेट घेतली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी, मुख्य वन संरक्षण व वनविभागाचे अधिकारी, व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ. दिनेशकुमार , मुख्य वनसंरक्षक संजय गौर, आकोटचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, आदींची उपस्थिती होती.