Search Forum
Blog Entry# 5521261
Posted: Oct 21 2022 (18:55)
No Responses Yet
No Responses Yet
Oct 21 2022 (18:55) 08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special (UnReserved) | TMR/Tumsar Road Junction (5 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR 130 blog postsअखेर इतवारी-तुमसर रोड-तिरोडी पॅसेंजर गाडी सुरू
महाराष्ट्र व मध्येप्रदेशातील प्रवाशांना झाला आनंद
तिरोडी-इतवारी पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू झाल्याने या रेल्वे मार्गावर असलेल्या ग्रामीण भागातील बहुसंख्य प्रवाशांना आनंद झाला आहे. या ट्रेनमुळे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर...
more...

सीमावर्ती भागातील नागरिक तसेच मध्यप्रदेश राज्याच्या दक्षिण सीमेवर राहणाऱ्या बहुसंख्य नागरिकांना तुमसर, भंडारा नागपूर शहरात ये-जा करणे सोयीचे झाले. दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या प्रधान मुख्य संचालन व्यवस्थापक कार्यालय, बिलासपूर (सीजी) यांच्या कार्यालयाने १८ ऑक्टोंबरपासून तिरोडी ते इतवारी पॅसेंजर रेल्वेला तिरोडी स्थानकातून सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यांनतर सोमवारी तब्बल अडीच वर्षांनंतर सातपुडा पर्वत रंगांतून दोन राज्यांना जोडणारी तिरोडी ते इतवारी पॅसेंजर गाडी आपल्या मार्गिकेवर पूर्ववत डौलाने धावली. यावेळी तिरोडी, सुकळी, महकेपार रोड, डोंगरी बुजुर्ग, गोबरवाही, चिंचोली, मिटेवानी, तुमसर टाऊन, तुमसर रोड, कोका, भंडारा रोड व या गाडीच्या मार्गावरील अन्य स्थानकांच्या परिसरात राहणाऱ्या स्थानिकांनी आपल्या लाडक्या पॅसेंजर गाडीला हात हलवून आपला आनंद व्यक्त केला. तिरोडी-इतवारी (०८२८२) गाडीने रुग्णांना नागपूरला उपचारासाठी जाणे सोयीचे झाले. यासोबतच शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, बाजारातील विक्रेते आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. तुमसर ते तिरोडी दरम्यान चिखला व डोंगरी येथे मॅग्निज खाणी असून हजारो कामगार या दोन्ही खाणीमध्ये काम करतात. या कामगारांचा व त्यांच्या परिवाराचा नागपूर शहराशी कामानिमित्त संबंध येतो; परंतु अडीच वर्षांपासून प्रवासी रेल्वे गाडी बंद असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाविरुद्ध स्थानकांमध्ये असंतोषही दिसून येत होता.
१७ ऑक्टोबरला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी इतवारी ते तिरोडी पॅसेंजर (०८२८१) गाडीला तिरोडीच्या दिशेने रवाना करण्यात आले व आज सोमवारी (१८ ऑक्टोबर) ही गाडी इतवारीच्या दिशेने सकाळी ०८:०५ मिनिटांनी रवाना झाली. ही गाडी पुन्हा रुळावर आल्याने तुमसर व मोहाडी तालुक्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला. ही गाडी गेल्या अडीच वर्षांपासून बंद होती. यासाठी दैनिक भंडारा पत्रिका वृत्तपत्राने अनेकदा रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. ही गाडी सुरू व्हावी यासाठी भारतीय यात्री केंद्र समितीने नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना अनेकदा निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आल्याच्या भावना समितीचे कार्यकर्ते करत आहेत. या गाडीचे सोमवारी तुमसर टाऊन (पीएच) स्थानकात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खा. मधुकर कुकडे, भारतीय यात्री केंद्र समितीचे सदस्य सीताराम जोशी, लिलाधर वाडीभस्मे, दिनेश नागापोता, अरुण लांजेवार, संदीप पेठे, किशोर चौधरी, आशिष कुकडे, खुशाल बुरडे, नवनीत जोशी, मनोज जोशी, अशोक कुकडे यांनी लोकोमोटिव्हचे पूजन करून गाडीप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली. तिरोडी-इतवारी प्रवासी रेल्वे गाडी सुरू व्हावी याकरिता भारतीय यात्री केंद्र समिती सदस्य प्रभाकर नायडू, सिताराम जोशी, सुरेश बेलूरकर, लिलाधर वाडीभस्मे, बेनीराम खंडेलवाल, मधुकर सांभारे, यांनी बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन यांना निवेदन दिले होते. यापूर्वी तुमसर-तिरोडी ही प्रवासी गाडी २१ मार्चला सुरू करण्यात आली होती; परंतु ते तिरोडी ते इतवारी पॅसेंजर बंद होती. त्यानंतर १४ ऑक्टोबर ला रेल्वे प्रशासनाने तिरोडी ते इतवारी दरम्यान प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्याचे आदेश दिले व आज १८ ऑक्टोबर ला ही गाडी धावली. यामुळे मध्य प्रदेशातून व तुमसर तालुक्यातील शेवटच्या टोकावरून नागरिक, विद्यार्थी व व्यवसायिक थेट नागपूरला जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भारतीय यात्री केंद्र समिती लायन्स क्लब, व्यापारी असोसिएशन ललितम, भंडारा जिल्हा ग्राम स्वराज्य मंडळ, या संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या सगळ्या नागरिक उपस्थित होते. यावेळी यात्री केंद्र समितीचे पदाधिकाऱ्यांनी लोको पायलट प्रवीण खडके, सहायक लोको पायलट करण दांडेकर, लोको निरीक्षक आर. के. वर्मा, गार्ड कोल मेथी यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी यात्री केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व तुमसर स्थानकात उपस्थित प्रवाशांना व नागरिकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
तिरोडी मार्गिकेरील गाड्यांचे वेळापत्रक
तिरोडी वरून सकाळी ०८:०५ मिनिटांनी सुटून महत्वाच्या स्थानकांपैकी तुमसर टाऊन येथे ०९:०१ मिनिटांनी, तुमसर रोड स्थानकात ०९:२५ मिनिटांनी, भंडारा रोड (वरठी) ०९:४७ मिनिटांनी व इतवारी स्थानकात ११:३५ मिनिटांनी पोहचते.
या गाडीचा परतीचा प्रवास इतवारी येथून दुपारी ०१:१० सुरू होतो. यानंतर महत्वाच्या स्थानकांपैकी भंडारा रोड (वरठी) स्थानकात ०२:३२, तुमसर रोड ०३:२५, तुमसर टाऊन ०३:४३ व अखेरीस ५ वाजता तिरोडी येथे पोहचते.
याव्यतिरिक्त तुमसर-तिरोडी (०८२८३) ही गाडी पूर्वीप्रमाणे सकाळी ०५:४५ ला तुमसर रोड स्थाकातून सुटून सकाळी ०७:२० ला तिरोडी स्थानकात एकूण ९ स्थानकांतून ४६ किलोमीटरचा प्रवास करत पोहचते. तिरोडी-तुमसर (०८२८४) ही गाडी सायंकाळी ०५:३५ मिनिटांनी तिरोडी स्थानकातून सुटून व ०६:५० ला तुमसर रोड रेल्वे स्थानकात रात्रीच्या मुक्कामी विसावते.
तिरोडी ते इतवारी पॅसेंजर गाडीबद्दल
इतवारी-तिरोडी-इतवारी पॅसेंजर (०८२८१/०८२८२) गाडी दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या डब्ल्यू.ए.पी. लोकोमोटिव्हसह धावते. ही गाडी ३ तास १५ मितीटांच्या कालावधीत इतवारी ते तिरोडी दरम्यान १८ रेल्वे स्थानकांवर थांबते. या गाडीचा सरासरी वेळ ३२ किमी/तास एवढा आहे. ही गाडी पॅसेंजर स्वरूपाची असून सप्ताहातील सातही दिवस धावते. ही गाडी तिरोडी, सुकळी, महकेपार रोड, डोंगरी बुजुर्ग, गोबरवाही, चिंचोली, मिटेवानी, तुमसर टाऊन, तुमसर रोड, कोका, भंडारा रोड, खात, रेवराल, तारसा, चाचेर, सलवा, कन्हान, कामठी, कलमना व इतवारी इतवारी या रेल्वे स्थानकांना जोडते.

please wait...Translate to English
please wait...Translate to Hindi