Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal Android   RailCal iPhone

site support

Ammi Jaan kahti thi Railfanning se bada koi dharm nhi hota or koi Railfan chhota nhi hota - Shanzil Kabir

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5528049
Posted: Oct 28 2022 (12:50)

No Responses Yet
General Travel
4630 views
0

Oct 28 2022 (12:50)   TMR/Tumsar Road Junction (5 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5528049            Tags  
The railway administration, which claims to provide world-class facilities to railway passengers, had to cancel the train during Diwali due to late arrival of the passenger train and technical reasons. Due to this, the railway passengers had to suffer a lot of inconvenience and suffering. Long distance express trains always run late on Mumbai Howrah railway line. Hence, the schedule of passengers collapses here.

A freight train derailed near Badnera railway station in Nagpur division on October 24. On festival days like Ain Diwali, express and other passenger
...
more...
trains were running late due to technical reasons. Passengers traveling from Bhandara Road and Tumsar Road stations have to endure constant agony. Already around 36 superfast trains do not stop here. Passengers have to go to Nagpur or Gondia. You have to sit there fast.

.......

दिवाळी झाली प्रवासातच : मुंबई हावडा रेल्वे मार्गावर प्रवाशांचे हाल

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मार्गिकेवरील रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

मोहाडी : रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाची सुविधा पुरविण्याच्या दावा करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने दिवाळीच्या काळात प्रवासी गाडी उशिरा येणे व तांत्रिक कारणामुळे रेल्वे रद्द करण्याची वेळ रेल्वे प्रशासनावर आली होती. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊन मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबई हावडा रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या नेहमीच उशिरा धावतात. त्यामुळे प्रवाशांचे वेळापत्रक येथे कोलमडते.

नागपूर विभागात बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ २४ ऑक्टोबर रोजी मालगाडी रेल्वे ट्रॅक वरून खाली उतरली होती. ऐन दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसात तांत्रिक कारणामुळे एक्सप्रेससह इतर पॅसेंजर रेल्वे उशिरा धावत होत्या. भंडारा रोड आणि तुमसर रोड स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कायम मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच जवळपास ३६ सुपरफास्ट गाड्यांना येथे थांबा नाही. प्रवाशांना नागपूर किंवा गोंदियाला जावे लागते. तेथे ताटकळत बसावे लागते.

महाराष्ट्र एक्सप्रेस रद्द

बडनेरा जवळ मालगाडी रेल्वे रुळा वरुन खाली उतरल्याने एक्सप्रेस गाड्यांना त्याच्या अधिक फटका बसला. गोंदियावरून कोल्हापूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस दिनांक २४ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आली होती. तर इतर प्रवासी गाड्या उशिरा धावल्या. प्रवाशांना वेळेवर घरी जाता आला नाही.

या मार्गांवर प्रवाशांचे हाल

नागपूर ते गोंदिया दरम्यान काही पॅसेंजर रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या तर काही अद्यापही बंद आहेत. कोरोना नंतर या मार्गावर रेल्वे प्रशासनाने पूर्ण क्षमतेने लोकल गाड्या अजूनही सुरू केल्या नाहीत. तसेच तुमसर ति रोड़ी दरम्यान पूर्ण क्षमतेने प्रवासी गाडी अजूनही सुरु झाल्या नाहीत.

एक्सप्रेस गाड्या लेट

मुंबई हावडा रेल्वे मार्ग हा दक्षिण पूर्व रेल्वेच्या महत्त्वपूर्ण रेल्वे मार्ग मानला जातो रेल्वे प्रशासनाला या विभागात मोठा आर्थिक फायदा होतो. तर दुसरीकडे या मार्गावरील कुर्ला हावडा ही एक्सप्रेस गाडी लेट राहते. कधी कधी ही गाडी सुमारे दोन ते तीन तास उशिरा धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस ही गोंदियावरुन सुटते. नागपूरनंतर ही गाडी उशिरा धावत असल्याचे प्रवासी सांगत असतात.

काही गाड्यांचे मार्ग वळवले

बडनेराजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून उतरल्याने अनेक गाड्यांना फटका बसला. रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग वळविले होते.

सणासुदीच्या दिवसात उशिरा धावणाऱ्या आणि मार्ग बदलविल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गिकेवर रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहेत.

तिसऱ्या व चवथ्या लोहमार्ग कामाचा फटका

नागपूर-रायपूर-बिलासपूर दरम्यान तिसया व चवथ्या लोहमार्गाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेकदा मेगा ब्लॉक घेतला जातो. दुसरीकडे मालगाड्या मात्र नियमित धावताना दिसतात.

पॅसेंजर रेल्वे पूर्ववत सुरु करा

नागपूर विभागात मुंबई हावडा रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्या उशिरा धावतात. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतो. नागपूर गोंदिया डोंगरगड दरम्यान पॅसेंजर गाड्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या नाही. मुंबई हावड़ा रेल्वे मार्गावर एक्सप्रेस गाड्या अनेकदा लेट धावतात. त्याचा फटका रेल्वे प्रवाशांना बसतो तसेच नागपूर गोंदिया दरम्यान धावणाच्या पॅसेंजर गाड्या पूर्ववत सुरु करण्याची गरज आहे.

-लिलाधार वाडीभस्मे, सदस्य भारतीय यात्री समिती

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy