Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

SBC - Kranti Veera Sangolli Rayanna Bengaluru: Station in Garden - Dinesh Kumar

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5528978
Posted: Oct 29 2022 (10:20)

No Responses Yet
Info Update
31505 views
0

Oct 29 2022 (10:20)   12105/Vidarbha SF Express (PT) | TMR/Tumsar Road Junction (5 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5528978            Tags  
तत्काळ तिकिटांसाठी रेल्वे काउंटरवर रांगा

तुमसर रोड, कोका, भंडारा रोड स्थानकात तिकीटांसाठी सकाळपासून येतात प्रवासी

मोहाडी : तालुक्यातील पुणे-मुबईत काम करणाऱ्यांची संख्या फार मोठा आहे. दिवाळी होऊन अवघे काही दिवस झाले आहेत. यंदा
...
more...
दिवाळीनिमित्त गावाकडे आलेल्या चाकरमान्यांची संख्या फार मोठी आहे. अशा परिस्थितीत दिवाळीनिमित्त घरी जाण्यासाठी अनेकांनी आगाऊ तिकीट काढले होते. परंतु अनेकांनी परतीच्या प्रवासाचे तिकिटे घेतली नव्हती. त्यामुळे आता परत शहराकडे जातांना अनेक गाड्यांमध्ये तिकीट बुक करणे खूप कठीण काम झाले आहे. दिवाळीच्या निमित्ताने गावी जाण्यासाठी अनेकजण ट्रेनमध्ये तिकीट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना गाड्यांमध्ये निश्चित जागा मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांना गावी जाण्यासाठी तत्काळ ट्रेनची तिकिटे काढावी लागत आहेत. तथापि, या क्षणी तत्काळ ट्रेनचे तिकीट बुक करणे सोपे काम नाही. जिल्ह्यातील तुमसर रोड, कोका, भंडारा रोड स्थानकात अनेक प्रवासी उद्याचे तत्काळ तिकिटे मिळविण्यासाठी रेल्वे काउंटरवर रांगा लावून उभे दिसत आहेत.

दिवाळी नंतर लोकांना तातडीने प्रवासाचे नियोजन करावे लागत आहे आणि रेल्वेचे तिकीट बुक करावे लागत आहे. तथापि, कन्फर्म केलेले तिकीट हे ट्रेनमधील जागांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते आणि येथे तत्काळ सुविधा लागू होते. ज्या लोकांना अचानक प्रवास करावा लागतो त्यांना लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने तत्काल व्यवस्था सुरू केली आहे. ट्रेनचे तत्काळ तिकीट बुकिंग प्रवासाच्या फक्त एक दिवस आधी बुक करण्यासाठी प्रवासी धडपडत आहेत. तरीही अनेकांना लांब रांगेत उभे राहूनही कन्फर्म ट्रेन तिकीट मिळत नाही. तत्काळ तिकिटांसाठी रोड रेल्वे स्थानकात खूप गर्दी पहावयास मिळते आहे. अस काही प्रवासी आयआरसीटीसीच्या तत्काळ तिकीट बुकिंग सेवेचा लाभही घेत आहेत. प्रवाशांना तत्काळ तिकिटे मिळवण्यासाठी खूप घाई करावी लागत आहे. अनेक लोक तत्काळ तिकिटांचे बुकिंग देखील चुकवत आहेत. या सणासुदीच्या दिवसांमध्ये आयआरसीटीसीची तत्काळ तिकीट सुविधा कामी येते. भारतीय रेल्वेची ही सुविधा अचानक प्रवास करताना कामी येते.तत्काळ तिकिटे एक दिवस अगोदर बुक करता येतात. वातानुकूलित क्लाससाठी तत्काळ बुकिंगची वेळ सकाळी १० आणि स्लीपर क्लाससाठी ११ वाजताची आहे.
.....
Queue up at the railway counter for instant tickets

Passengers come from morning for tickets at Tumsar Road, Koka, Bhandara Road station

Mohadi : The number of people working in Pune-Mumbai in the taluka is very large. Diwali is just a few days away. This year, the number of servants who have come to the village on the occasion of Diwali is very large. In such a situation, many people had booked tickets in advance to go home on Diwali. But many had not taken return tickets. So now it has become a very difficult task to book tickets in many trains while going back to the city. On the occasion of Diwali, many people are trying to get tickets in the train to go to the village. However, they cannot get a fixed seat in the trains due to non-availability of seats. In such a situation, many people have to buy train tickets immediately to go to the village. However, booking an instant train ticket is not an easy task these days. At Tumsar Road, Koka, Bhandara Road stations in the district, many passengers are seen queuing up at the railway counters to get immediate tickets for tomorrow.

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy