Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

এক রাজ্য, দুই রাণী।নাম তাদের, শালিমার ও আলিপুরদুয়ার রাজ্যরানী - Dip

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5932334
Posted: Jan 04 (23:05)

No Responses Yet
Info Update
2021 views
0

Jan 04 (23:05)  
PrakharYadav^~
PrakharYadav^~   12843 blog posts
Entry# 5932334               Past Edits
एका पोस्टने अधिकाऱ्याची बदली
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. ३१ : पुण्यासह देशातील विविध रेल्वे स्थानकांवर रेल्वे प्रशासनाने सेल्फी पॉइंट तयार केले असून, तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोठा फोटोही लावला आहे. मात्र, एका सेल्फी पॉइंटसाठी आलेल्या खर्चाची माहिती देणे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यास चांगलेच महागात पडले. रेल्वे बोडनि संबंधित पोस्टची दखल घेऊन त्यांची थेट मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी या पदावरून हकालपट्टी केली. मात्र
...
more...
ज्या अधिकाऱ्याच्या सहीने ही माहिती समोर आली, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

देशातील सर्वच प्रमुख रेल्वे स्थानकांवर 'डिजिटल इंडिया' संकल्पनेवर सेल्फी पॉइंट तयार केले आहेत. गेल्या आठवड्यात एका माहिती अधिकार कार्यकत्यनि मध्य रेल्वेसह देशातील १७ झोनच्या सेल्फी पॉइंटची माहिती मागितली. यात एका सेल्फी पॉइंटसाठी किती खर्च येतो, ही देखील माहिती विचारली होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी ती माहिती दिली. संबंधित कार्यकत्यनि त्या माहितीची कागदपत्रे समाजमाध्यमावर पोस्ट केली. त्यानंतर काँगेसचे नेते खासदार शशी थरूर यांनी देखील तेच द्विट रीट्टिट केले.

रेल्वे बोडनि याची गंभीर दखल घेत, डॉ. मानसपुरे यांना पदावरून तत्काळ हटविले. मात्र ज्या अधिकाऱ्याने आपल्या सहीद्वारे ही माहिती उपलब्ध करून दिली, त्यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. मानसपुरे यांची नियुक्ती मे २०२३ मध्ये झाली होती. अवघ्या सात महिन्यात त्यांना या पदावरून दूर करण्यात आले.

सेल्फी पॉइंटची किंमत सांगणे, त्यांना चांगलेच महागात पडले. डॉ. मानसपुरे यांच्या जागी पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांची नियुक्ती केली आहे. त्यांनी आपला पदभारही स्वीकारला आहे. मानसपुरे हे अद्याप पोस्टिंगच्या प्रतीक्षेत आहेत.

3D #SelfiePoint

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy