Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailCal app

site support

WAP-7 - दिल तुझपे कुर्बान

Search Forum
<<prev entry    next entry>>
Blog Entry# 5959013
Posted: Feb 02 (08:37)

No Responses Yet
General Travel
3424 views
0

Feb 02 (08:37)  
Fortyville
Fortyville   258 blog posts
Entry# 5959013              
मुंबई : अर्थमंत्री निर्माला सिमारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) गुरुवार 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला. तसेच यावेळी रेल्वेच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला 15 हजार 554 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी दिली. मागील वर्षी महाराष्ट्रात रेल्वेसाठी 13 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे मार्गिकेला घसघसशीत निधी आल्याचं चित्र आहे. नवी रेल्वे मार्गिका, दुसरी, तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका यासाठी देखील निधी दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे कसारा,कर्जत आणि पुणे या रेल्वेयार्डाचं नुतनीकरण केलं जाईल. सीएसएमटी, एलटीटीच्या विकासाठी देखील निधी दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. नेमकं महाराष्ट्राला रेल्वेच्या बजेटमध्ये काय मिळालं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
देशाच्या
...
more...
अंतरिम बजेटमधून महाराष्ट्रात रेल्वेला काय मिळालं?
महाराष्ट्रातील एकूण सहा नवीन मार्गिकांसाठी तरतूद करण्यात आलीये. त्यासाठी जवळपास 1 हजार 940 कोटी रुपयांची तरतूद असणार आहे. तसेच यामध्ये दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका या प्रकल्पांसाठी देखील अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद झालीये. या प्रकल्पांसाठी जवळपास 1,610 तरतूद असणार आहे. तसेच यामध्ये सीएसएमटी म्हणजे छत्रपची शिवाजी महाराज टर्मिनस आणि एलएलटी या स्थानकांच्या विकासकामांसाठी तरतदू आहे.

नवीन रेल्वे मार्गिका
नगर बीड परळी रेल्वे मार्ग - 275 कोटी
बारामती लोणंद रेल्वे मार्ग - 330 कोटी
वर्धा नांदेड रेल्वे मार्ग - 750 कोटी
सोलापूर उस्मानाबाद तुळजापूर रेल्वे मार्ग - 225 कोटी
धुळे नरडाणा रेल्वे मार्ग - 350 कोटी
कल्याण मुरबाड बारस्ता उल्हासनगर रेल्वे मार्ग - 10 कोटी

दुसरी, तिसरी आणि चौथी मार्गिका प्रकल्प
कल्याण कसारा तिसरी मार्गिका - 85 कोटी
वर्धा नागपूर रेल्वे तिसरी मार्गिका - 125 कोटी
वर्धा बल्लार शाहा तिसरी मार्गिका - 200 कोटी
इटारसी नागपूर तिसरी मार्गिका - 320 कोटी
पुणे मिरज रेल्वे दुसरी मार्गिका - 200 कोटी
दौंड मनमाड दुसरी मार्गिका - 300 कोटी
वर्धा नागपूर 4 थी मार्गिका - 120 कोटी
मनमाड जळगाव तिसरी मार्गिका - 120 कोटी
जळगाव भुसावळ चौथी मार्गिका - 40 कोटी
भुसावळ वर्धा तिसरी मार्गिका - 100 कोटी

गेज रूपांतर
पाचोरा जामनेर मार्गासाठी - 300 कोटी

यार्ड remodeling
कसारा - 1 कोटी
कर्जत - 10 कोटी
पुणे - 25 कोटी

सीएसएमटी साठी प्लॅटफॉर्म लांबीकरण - 10 कोटी
एलटीटी स्थानक - 2 कोटी

यामुळे आता महाराष्ट्रातील रेल्वेला गती मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये रेल्वेत कोणत्या सुधारणा होतील याकडे लक्ष लागून राहिल. Good news for Bhusawal,Bodwad,Chalisgaon,Dhule,Jalgaon,Manmad,Nardana,Daund,Nashik

Translate to English
Translate to Hindi
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy