बोरिवली येणार ४0 मिनिटांनी जवळ
अनिकेत घमंडी। दि. १ (ठाणे)
वसई-दिवा-पनवेल सेक्शनला रेल्वे मंत्रालय/बोर्डाने हिरवा कंदील देत सबर्बनचा दर्जा घोषित केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ दर्जाच्या विश्वसनीय सूत्रांनी लोकमतला दिली. या मार्गाला सबर्बनचा दर्जा दिल्याने या मार्गावरील हजारो प्रवाशांच्या रोजच्या प्रवासाची तब्बल ४0 मिनिटे वाचणार असून मार्गावरील रेल्वे स्थानकांना मूलभूत सुविधा मिळतील.
सध्या या मार्गावर मेमू ट्रेन धावतात. या गाड्यांच्या दिवसातून चार-पाच फेर्या होत...
more... असल्याने पाहिजे त्या प्रमाणात वाहतूक होत नाही. येथून मालगाड्यांसह गुजरात पट्ट्यात जाणार्या लांब पल्ल्यांच्या गाड्या अधिक धावतात. सबर्बनचा दर्जा मिळाल्याने या मार्गावरून लवकरच ईएमयू लोकल धावण्यास सुरुवात होईल, असे पश्चिम रेल्वेचे सेवानवृत्त अधिकारी अँड. दत्तात्रेय गोडबोले यांनी सांगितले. गोडबोलेंनाही मध्य रेल्वेच्या वरिष्ठ सूत्रांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
बोरिवलीही येणार जवळ
सध्या बोरिवलीला जाण्यासाठी मध्य रेल्वे लोकलने दादरला जावे लागते. त्यानंतर, लोकल बदलून पश्चिम रेल्वेमार्गे बोरिवलीला जाता येते. यामध्ये प्रवाशांचा तब्बल दीड-दोन तास वेळ जातो. वरील रेल्वे मार्ग सबर्बन झाल्यास प्रवाशांना दादरला जाण्याचा त्रास वाचेल. त्यांना दिवा-वसई रोड मार्गावरून बोरिवलीला जाता येईल. यामध्ये त्यांचा पाऊण तास वाचेल. वसई रोडवरून प्रवाशांना प.रे.ने नायगाव, भाईंदर, मीरा रोड, दहिसरमार्गे बोरिवली स्थानकात जाता येईल.
मेमूचा वापर कर्जत-पनवेल मार्गावर
सबर्बन दर्जामुळे या ठिकाणी ईएमयू लोकल धावतील. परिणामी, येथील सध्याच्या मेमू गाड्या कर्जत-पनवेल मार्गावर धावल्यास तेथील प्रवाशांची सोय होईल. तसेच आवश्यकता वाटल्यास मेमू ट्रेन लोणावळ्यापर्यंतही चालवता येतील, असे अँड. गोडबोले सांगतात.
३१ किमीचा प्रवासही वाचणार
बोरिवली व्हाया दादर अंतर ८४ किमी असून सबर्बनची सोय झाल्यामुळे हे अंतर कमीतकमी वेळात कापता येईल. त्यामुळे तब्बल ३१ किमी अंतर कमी होणार आहे. दिवा-वसई-बोरिवली हे अंतर ५३/५४ किमी आहे.
वसई रोड-दिवा-पनवेल सध्याचा मेमूचा मार्ग
वसई रोड-कामण, खारबाव, भिवंडी रोड, लोअर कोपर, दिवा.
दिवा-दातिवली, निळजे, तळोजा, नावाडे रोड, कळंबोली, पनवेल.
प्रवाशांचे २0 रुपये वाचणार
सध्या बोरिवली, भाईंदर आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना सुमारे ४५ ते ५0 रुपये खर्च करावे लागतात. ही सुविधा झाल्यास त्यांचा वेळेसह सुमारे २0 रुपये खर्च वाचणार आहे.