Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt

RailFanning is an art-form; RailFans are the paints - Ayush Kumar Singh

Search News

News Posts by E4envy

Page#    Showing 1 to 2 of 2 news entries  
May 18 2017 (15:26) The possibility of paying extra money for lower berths in the railway (epunyanagari.com)
Coach Augmentations
SCR/South Central
7177 views
0

News Entry# 302763   
  Past Edits
May 18 2017 (15:26)
Station Tag: Mumbai Chhatrapati Shivaji Terminus/CSTM added by E4envy/1563546
Stations:  Mumbai CSM Terminus/CSTM  
MUMBAI: There is a huge demand for sleeper berths on the train journey in the night. There is more demand for the lower berth in it....

8526 views
0

May 18 2017 (15:27)
Balasaheb shinde   20 blog posts
Re# 2281726-1              
रेल्वेत लोअर बर्थसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता
मुंबई : रेल्वेच्या प्रवासात रात्री स्लीपर बर्थला प्रचंड मागणी असतेच. त्यात एकदम खालच्या बर्थसाठी अधिक मागणी असते. रुग्ण आणि वृद्धांसाठी तर एकदम खालचा बर्थ अत्यंत सोयीचा ठरतो. त्यामुळे रेल्वेच्या स्लीपर डब्यात लोअर बर्थ बुक करायचा असेल, तर आता तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कदाचित ५0 ते १00 रुपये जादा द्यावे लागण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच नवे धोरणा आणण्याची तयारी रेल्वे प्रशासन करत आहे.रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना बर्थचा पर्याय निवडावा लागतो. या वेळी प्रवासी लोअर बर्थ निवडतात. महिला वर्ग, गरोदर स्त्रिया आणि ज्येष्ठ नागरिक नेहमी लोअर बर्थला प्राधान्य देतात. चार्ट बनवताना रेल्वे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा विचार करतात. लोअर बर्थच्या याच वाढत्या मागणीनुसार त्यावर अधिकचा दर आकारण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. त्यामुळे
...
more...
लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असल्यास आता मूळ तिकिटासोबतच अतिरिक्त ५0 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. रेल्वेचे उत्पन्न वाढवण्यासाठी रेल्वे प्रशासन नवनवीन शक्कल लढवताना दिसते. हा देखील त्याचाच एक भाग आहे; पण महिला, गरोदर माता आणि ज्येष्ठांसाठी हा निर्णय जुलमी ठरू शकतो. रेल्वे मंत्रालयानुसार, जर लोअर बर्थसाठी अतिरिक्त रुपये वसूल केले, तर लोकांची मागणी कमी होईल. परिणामी, लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध होईल, असाही एक तर्क लढवला जात आहे.

Translate to English
Translate to Hindi
May 13 2017 (11:15) Keyman's alertness avoids huge disaster. 150 keys of track near the parli railway station are missing. (epunyanagari.com)
Crime/Accidents
SCR/South Central
7471 views
0

News Entry# 302344   
  Past Edits
May 13 2017 (11:15)
Station Tag: Hyderabad Deccan Nampally/HYB added by E4envy/1563546

May 13 2017 (11:15)
Station Tag: Parli Vaijnath/PRLI added by E4envy/1563546
A large trouble created by removal of 150 to 200 keys of the railway track on the route going to Hyderabad (HYB) near Parli (PRLI)....

8408 views
0

May 13 2017 (11:19)
Balasaheb shinde   20 blog posts
Re# 2275106-1               Past Edits
Keyman's alertness avoids huge disaster. 150 keys of track near the parli (PRLI) railway station are missing.
रेल्वे घातपाताचा कट उधळला परळीजवळ रुळाच्या १५0 चाव्या गायब किमॅनच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
परळी : परळीजवळील हैदराबादकडे जाणार्‍या मार्गावरील रेल्वे रुळाच्या १५0 ते २00 चाव्या काढल्याने मोठी खळबळ उडाली. या मार्गावर रेल्वे घातपात करण्याच्या उद्देशाने रेल्वे रुळाच्या चाव्या काढल्या का? याची शहानिशा प्रशासन करीत असून, याबाबतच्या सर्व शक्यता पडताळल्या जात आहेत. वेळीच या क्षेत्राच्या किमॅनच्या लक्षात ही बाब आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
परळी
...
more...
रेल्वे स्टेशनपासून हैदराबादकडे जाणार्‍या मार्गावरील गेट नंबर १२0 जवळ रेल्वे पटरीवरील १५0 ते २00 रुळाच्या चाव्या अज्ञाताने रात्रीच्या सुमारास काढून टाकल्याचे निदर्शनास आले. या गेटपासून २६६/३ ते २६५/१४ या क्रमांकापर्यंतच्या रुळाच्या दोन्ही बाजूला असलेल्या चाव्या काढून टाकण्यात आल्याचे रेल्वेचे किमॅन अंशुमन कुमार यांच्या सकाळी ७.२0 वा. निदर्शनास आले. त्यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठांना ही बाब कळवून तातडीने नवीन चाव्या बसवून रेल्वेमार्ग सुरक्षित केला. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली असून, वारंवार रेल्वे मार्गावर वाहतुकीला येणारे अडथळे, तांत्रिक बाबींमध्ये खोडसाळपणा करणो, रेल्वे पटर्‍यावर दगड ठेवणो आदी प्रकार मोठय़ा प्रमाणात समोर येत आहेत. त्यातच परळी या सर्व बाजूंना जाणार्‍या रेल्वेचे मध्यवर्ती स्थानकाजवळील रेल्वे मार्गावर ही खळबळजनक घटना घडली असल्याने हा घातपाताचाच प्रकार असावा, अशी शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी तातडीने परळीत दाखल झाले आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या एक्सपर्ट टीमने घटनास्थळी पाहणी केली.

Translate to English
Translate to Hindi
Page#    2 news entries  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Desktop site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy